Bhandara: भंडारा: कधी व्यायाम करताना तर कधी पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रकाश झोतात राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरेमोरे हे आता परत चर्चेत आले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू कोरेमोरे चर्चेचा विषय ठरले ते एका व्हायरल व्हिडिओमुळे. (Bhandara NCP MLA Raju Koremores Birthday Party dance went viral)
2019 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तुमसर क्षेत्रातून NCPचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे निवडून आले आहेत. ज्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे आमदार खुर्चीवर बसले, त्यातल्याच एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला शनिवारी त्यांनी हजेरी लावली होती.
सागर गभणे असं या कार्यकर्त्याचं नाव असून त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमदार साहेबांनी धम्माल उडवली. वाढदिवसाच्या पार्टीसाठी कार्यकर्त्याने डीजे लावाला होता, या डिजेवर वाजणाऱ्या बत्ती गुल पावरफूल या गाण्याने आमदार कोरेमोरे यांना ठुमके लावण्यास भाग पाडलं. आपल्या लाडक्या आमदारांना डिजेच्या गाण्यावर नाचताना पाहून कार्यकर्त्यांनीही देहभान हरपून नाचायला सुरुवात केली.