असे कोणी बस चालवतं का?  धोक्यात आला अनेक विद्यार्थ्यांचा जीव, पाहा [Video] 

व्हायरल झालं जी
Updated Sep 25, 2019 | 16:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

बेळगावमध्ये एका बस चालकाने अत्यंत धोकादायक पद्धतीने बस चालवून विद्यार्थ्यांच्या समूहाच्या अंगावर बस घालून निघून जातो. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे आपले प्राण वाचविले.  घटनेचा व्हिडिओ आला समोर... 

bus driver dangerously drives into group of boys belagavi karnataka news in marathi
असे कोणी बस चालवतं का?  धोक्यात आला अनेक विद्यार्थ्यांचा जीव, पाहा [Video]   |  फोटो सौजन्य: Times Now

बेळगाव :  बेळगावमधील एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक मंडळाच्या (NWKRTC)बसचा चालक अत्यंत खतरनाक पद्धतीने बस चालवताना दिसत आहे. त्यात तो रस्त्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करू ते बससमोर आलेले असतानाही बस थांबवत नाही. किंवा बसची गती कमी करत नाही. भरधाव वेगाने बस घेऊन पुढे निघून जातो. 

बस खूपच जवळ आल्यावर विद्यार्थी रस्त्यातून बाजूला होता. पण एक मुलगा बसच्या समोर उभा राहतो आणि आणण बसला रोखण्याचा प्रयत्न करतो. पण समोर विद्यार्थी असताना देखील बस चालक बस रोखत नाही. हा प्रकार बेळगाव येथील खानपूर येथे घडला. 

विद्यार्थी ओरडत होते, तरी ड्रायव्हर बस थांबवत नाही. विद्यार्थ्यांनी बसचा पाठलागही केला. पण बस थांबविण्यात येत अयशस्वी राहिले. दरम्यान, चालकाविरूद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...