VIDEO: मंत्री महोदयांचा महिलांसोबत डान्स; कोविड नियमांचा फज्जा, व्हिडिओ व्हायरल

एक मंत्री महोदय महिला नर्तकांसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मंत्री बेधुंद होऊन नाचताना दिसत आहेत. इतकेच नाही तर कार्यक्रमात पैशांची उधळण होतानाही दिसत आहे.

chhattisgarh minister dance with women dancer in a event video goes viral
VIDEO: मंत्री महोदयांचा महिलांसोबत डान्स; कोविड नियमांचा फज्जा, व्हिडिओ व्हायरल   |  फोटो सौजन्य: Times Now

रायपूर : देशभरात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोनापासून बचावासाठी नागरिक सोशल डिस्टंन्सिंगचे नियम (social distancing), मास्क (face mask) परिधान करताना दिसत आहेत. मात्र सर्वसामान्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे मंत्री महोदयांचा एक व्हिडिओ सर्वांनाच चकीत करत आहे. हा व्हिडिओ छत्तीगसड (Chhattisgarh)मधील आहे. तेथील काँग्रेस पक्षाचे आमदार आणि राज्यमंत्री महिला नर्तकांसोबत डान्स करताना व्हिडिओत दिसत आहेत.

छत्तीसगढमधील भरतपूर-सोनहत (Bharatpur-Sonhat) येथील काँग्रेस आमदार आणि राज्यमंत्री गुलाब कमरो (Congress minister Gulab Kamro) यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मंत्री महिला नर्तकांसोबत बेधुंद होऊन नाचताना दिसत आहेत. मंत्री महोदयांनी आपल्या पदाची प्रतिष्ठाच नाही तर कोविड संदर्भातील नियम, मार्गदर्शक सूचनांकडे सुद्धा दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. मंत्री महोदयांनी फेस मास्क लावला नव्हता आणि त्यांच्यासोबत डान्स करणाऱ्या महिलांनीही फेस मास्क लावला नव्हता. व्हिडिओत दिसत आहे की, या कार्यक्रमात पैशांचीही उधळण होत आहे.

छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांचे कोरोना लसीवर पत्र 

कोरोना व्हायरस संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान केला नसल्यास अनेक राज्यांत दंड ठोठावण्यात येत आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी केली होती की, त्यांच्या राज्यात प्राधान्याने आणि तातडीने कोरोना लस मोफत द्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी