Cm Tiger caught in camera : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी (Tadoba Sanctuary) व्याघ्र प्रकल्पात पर्यटक (tourists) वाघोबाचे (tigers) दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. सध्या या अभयारण्यातील सीएम वाघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या अभयारण्यात प्रत्येकाला वाघोबा दिसेल असे नाही, बहुतेकांच्या पदरी व्याघ्र दर्शनाऐवजी निराशाच पडते. एखाद वेळेस वाघ दिसलाच तोही अवघ्या काही क्षणांसाठीच. मग काय मन भरून वाघोबाला पाहण्याची अपेक्षा ही अपूर्णच राहते. परंतु सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाघोबा दिसणारच शिवाय त्याचा ऐटबाज अंदाज देखील दिसेल. हा व्हिडिओ आहे, चंद्रपूरच्या रामदेगी जंगलातील. यावेळी वाघाने सर्व पर्यटकांना मन भरुन दर्शन दिलेच आणि त्याचा रुबाबही दाखवला. पर्यटकांना हा वाघ दिसला तो त्याने केलेल्या शिकारीसोबत. (Tiger in Tadoba Sanctuary caught in camera while having lunch happened in Chandrapur)
रामदेगीचं जंगल हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मोडतं. शेवटच्या अधिकृत आकडेवारीनुसार, येथे किमान 86 - 88 वाघ आहेत. यातलाच एक सीएम नावाचा थोरला वाघ आपली शिकार खाताना पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. एरवी शिकार केल्यानंतर वाघ आपली शिकार ओढून दुसरीकडे कुठेतरी घेऊन जातो. यावेळेस का कुणास ठाऊक त्याने मारलेलील शिकार अन्यत्र नेण्याचा प्रयत्न केला नाही. पण यामुळे पर्यटकांना त्याचा रुबाब पाहता आला.
महाराष्ट्रातील वाघांसाठी वाहिलेलं सुप्रसिद्ध अभयारण्य म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात हे व्याघ्रांसाठीचे विशेष अभयारण्य राज्य सरकारने 1955 मध्ये स्थापन केलं होतं. या प्रकल्पाने जिल्ह्यातील जवळपास 625 चौ कि.मी. क्षेत्र व्यापलं आहे.