काँग्रेस आमदारांवर महिलेची छेड काढल्याचा आरोप, ट्रेनमधील 'तो' व्हिडिओ आला समोर

व्हायरल झालं जी
Updated Oct 08, 2022 | 21:23 IST

Congress mla: धावत्या ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशासोबत छेडछाड केल्याचा काँग्रेस आमदारांवर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. 

मध्यप्रेदशातील काँग्रेसच्या दोन आमदारांवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी धावत्या ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशाची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. (congress mla allegedly tease woman in train swati maliwal shared video)

स्वाती मालिवाल यांनी आपल्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करताना स्वाती मालिवाल यांनी राहुल गांधी यांच्याकडे, या दोन आमदारांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी