लॉकडाऊन: बाइक घेऊन नवरा पोहचला नवरीच्या घरी, VIDEO होतोय व्हायरल 

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. अशा वातावरणात उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे एक वर वर वधूला नेण्यासाठी थेट बाइक घेऊन तिच्या घरी पोहचला

corona lockdown hit groom rushed to pick up bride on bike video going viral
लॉकडाऊन: बाइक घेऊन नवरा पोहचला नवरीच्या घरी, VIDEO होतोय व्हायरल   |  फोटो सौजन्य: Times Now

बिजनौर (उत्तरप्रदेश): जगातील अनेक देश कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे हादरुन गेले आहेत, भारत देखील यातून सुटू शकलेला नाही, कोरोनाशी लढा देण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यामुळे सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. पण याच दरम्यान, उत्तरप्रदेशच्या बिजनौरमध्ये लॉकडाऊन दरम्यान एक अतिशक मनोरंजक दृश्य पाहायला मिळालं. ते म्हणजे एक नवरा मुलगा दुचाकीवरून फक्त चार मित्रांसह वरात घेऊन नवरीच्या घरी पोहचला. 

उत्तर प्रदेशच्या नसीरपूर भागातून लॉकडाऊनच्या दिवशी विकास कुमार नावाचा नवरा मुलगा दुचाकीवरून आपल्या चार मित्रांसह बिजनौर येथील जाटान येथे लग्नासाठी पोहचला.

नवरा विकास कुमार यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्याला रस्तावरुन जात असताना बराच अडथळा केला. त्यामुळे या आनंदाच्या क्षणी नवरा मुलगा हा काहीसा नाराज होता. सध्या त्याच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी