[VIDEO]: धक्कादायक! वडिलांचा मुलीवर हातोडीनं हल्ला, व्हिडिओ व्हायरल 

Father attacks on daughter with hammer: आपल्या वडिलांनीच मुलीवर हातोडीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या हल्ल्यात मुलीच्या हाताला दुखापत झाली आहे.

father attack daughter hammer video goes viral social media karnataka crime news marathi
[VIDEO]: धक्कादायक! वडिलांचा मुलीवर हातोडीनं हल्ला, व्हिडिओ व्हायरल 

थोडं पण कामाचं

  • वडिलांनीच केला मुलीवर हातोडीने हल्ला
  • हल्ल्यात मुलीच्या हाताला दुखापत 
  • व्हिडिओ समोर आल्यावर वडिलांच्या अटकेची होऊ लागली मागणी
  • कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील घटना

हासन: कर्नाटकातील हासन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. हासन जिल्ह्यात एका वडिलांनीच आपल्या मुलीवर हातोडीने हल्ला केल्याचं समोर आलं आहे. दारुच्या नशेत असलेल्या वडिलांनी मुलीवर केलेल्या हल्ल्यात तिच्या हाताला दुखापत झाली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी या मुलीची आई सुद्धा घरीच होती.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, मुलीचे वडील भलामोठा हातोडा घेऊन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच मुलीचे वडिल हल्ला करताना एका सिनेमाचं गाणंही गात आहेत. आरोपीचं नाव प्रशांत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला असून या मुलीच्या वडिलांवर कारवाई करणअयाची मागणी होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत हा एक कॉफी इस्टेटचा मालक आहे आणि त्याला दोन मुली आहेत. असं म्हटलं जात आहे की, मुलगा न झाल्याने तो दारुच्या नशेत आपल्या दोन्ही मुलींना मारहाण करतो. वडील मारहाण करत असल्याचं दोन पैकी एका मुलीने मोबाइल कॅमेऱ्यात शूट केलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून प्रशांतला अटक करण्याची मागणी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी गुरुग्राम येथे सुद्धा हातोडीने मारहाण केल्याची एक घटना समोर आली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका व्यक्तीने कथित रुपात हातोडीने मारहाण करुन आपल्या पत्नीची हत्या केली होती. ही घटना शहरातील प्रेम पुरी परिसरात घडली होती. पीडित महिला आपला पती अशोक याच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती. आरोपी अशोकने पत्नीवर हातोडीने हल्ला केला आणि त्यानंतर चाकूने तिचा गळा कापल्याचं समोर आलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी