चिखलात खेळल्या जाणाऱ्या या खेळाची होतेय जगभरात चर्चा, जाणून घ्या काय आहे कारण

व्हायरल झालं जी
Updated Aug 03, 2022 | 19:18 IST

Viral video: केरळात नुकत्याच एका टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. या टुर्नामेंटचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून जगभरात चर्चाही होत आहे. 

Football tournament video viral: सोशल मीडियात सध्या अनेक फोटोज किंवा व्हिडिओज व्हायरल होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. अशाच प्रकारे केरळातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्याची चर्चा सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहे. समाजातील वाईट गोष्टींबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी विविध उपाय केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे जागरूक केलं जात आहे. पण केरळात असं काही सुरू आहे की ज्याची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.

केरळात चिखलातील फुटबॉल टूर्नामेंटचं आयोजन केलं. मलप्पुरममध्ये सामाजिक दुष्टप्रवृत्तींविरुद्ध जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये ८ टिम्सने सहभाग घेतला होता. या सर्व टिम्सने चिखलात हा खेळ मोठ्या आनंदाने खेळला. आता या खेळाची सर्वत्र जोरदार चर्चा होत असून त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी