[VIDEO] गणपती विर्सजनादरम्यान नागिन डान्स, नाचता-नाचताच एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: गणपती विसर्जन सोहळ्यात नागिन डान्स करत असतानाच एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. 

man_died_during_nagin_dance
[VIDEO] विर्सजनादरम्यान नागिन डान्स, नाचतानाच एकाचा मृत्यू 

थोडं पण कामाचं

  • नागिन डान्स करता-करताच एका व्यक्तीचा मृत्यू
  • गणपती विसर्जनादरम्यानच घडला हा विचित्र प्रकार
  • मध्यप्रदेशमधील सिवनी येथे घडली धक्कादायक घटना

भोपाळ: मध्यप्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे की, ज्याबाबत समजल्यास तुम्हालाही धक्का बसेल. सिवनी येथे गणपती विर्सजन मिरवणुकीदरम्यान नागिन डान्स करता-करताच एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. तसंच हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैदही झाला आहे. त्यामुळे या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन लोकं हे नागिन गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान हे सगळे लोकं अतिशय जल्लोषात नाचत असतानाच अचानक हा प्रकार घडला. ज्यामुळे येथील सर्वांनाच मोठा धक्का बसला. 

आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की, काही लोकं हे गर्दीमध्ये नागिन गाण्याच्या धूनवर नागिन डान्स करत होते. हा डान्स ऐन रंगात आलेला असतानाच तेथील एक जण हा नाचता-नाचता जोरात जमिनीवर कोसळला. सुरुवातीला अनेकांना असं वाटलं की, नाचून दमल्यामुळे तो तिथेच पडून राहिला आहे. पण बराच वेळ झाला तरी ती व्यक्ती उठत नसल्याने तेथील लोकांनी त्याला उठवण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांना नेमकं काय झालं आहे याबाबत माहिती पडलं. ही संपूर्ण घटना गुरुवारी रात्री घडली असल्याचं बोललं जात आहे. 

मृत व्यक्तीचं नाव हे गुरुचरण ठाकूर असल्याचं समजतं आहे. पण त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे की, त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालेला असू शकतो. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचता नाचताच या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान, गणपती विसर्जनाच्या वेळी मध्यप्रदेशमध्येच बोट तलावाता उलटून ११ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडली होती. यावेळी पाच जणांना वाचविण्यात यश आलं होतं. या संपूर्ण घटनेनंतर मध्यप्रदेश सरकारने चौकशी आदेश दिले होते. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदतही जाहीर केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी