Har Ghar Tiranga: तरुणाने धावत्या घोड्यावर दिली तिरंग्याला सलामी

Har Ghar Tiranga: धावत्या घोड्यावर उभे राहून तरुणाने तिरंग्याला सलामी दिली आहे. या तरुणाचा व्हिडिओ लोकांच्या हृदयाला भिडणारा आहे.

impact of pm modi appeal to small villages salute tricolor by standing on a running horse
तरुणाने धावत्या घोड्यावर दिली तिरंग्याला सलामी 

Har Ghar Tiranga: पंतप्रधान मोदींच्या तिरंगा मोहिमेबाबत देशातील प्रत्येक गावात उत्साहाचे वातावरण आहे.  घराशिवाय कार्यालये, परिसर इत्यादी तिरंगी ध्वजांनी सजवलेले आहेत. त्याचवेळी एका तरुणाने हृदयस्पर्शी काम केले आहे. तरुणाने धावत्या घोड्यावर उभे राहून तिरंग्याला सलामी दिली आहे. या तरुणाचा व्हिडिओ लोकांच्या हृदयाला भिडणारा आहे.

हा व्हिडिओ पंतप्रधान मोदींचे गृहराज्य गुजरातमधून समोर आला आहे. गुजरातमधील अमरेली येथील लिलिया गावातील एका घोडेस्वाराने पंतप्रधान मोदींच्या हर घर तिरंगा मोहिमेला अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे. 

अक्षय पटेल नावाच्या या घोडेस्वाराने धावत्या घोड्यावर उभे राहून तिरंग्याला सलामी दिली आहे. घोडा अतिशय वेगात पळताना दिसतोय. त्याचवेळी तरुण घोड्यावर उभा राहून अभिमानाने तिरंगा फडकावत आहे. यानंतर तो घोड्यावर बसून तिरंग्याला सलामी देतो. 

15 ऑगस्ट 2022 रोजी देश आपला 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. याचा अर्थ स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व जनतेला घरोघरी भारताचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' फडकवण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी