विद्यार्थी गेला सेल्फी घ्यायला... हत्तीला आला प्रचंड राग, हवेतच भिरकावलं; पाहा व्हिडिओ

Elephant Attack Video: जयपूरमध्ये एका हत्तीने गोंधळ घातला आणि दोन लोकांवर हल्ला केला. पाहा हा व्हिडिओ.

in anger elephant created a furore see what is  whole matter in video
विद्यार्थी गेला सेल्फी घ्यायला... हत्तीला आला प्रचंड राग, हवेतच भिरकावलं; पाहा व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Times Now

Elephant Attack Video: साधारणपणे हत्तीचा स्वभाव खूप शांत असतो. पण, जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो प्रचंड गोंधळ घालतो. सोशल मीडियावर तुम्हाला हत्तींचे एक एक मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. पण आता राजस्थानच्या जयपूरमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हत्तीने प्रचंड गोंधळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. 

अंबर पॅलेसजवळ हत्तीला इतका राग आला की त्याने दोन लोकांवर हल्ला केला. मात्र, कालांतराने माहूतने त्याच्यावर मात केली. 

एक विद्यार्थी हत्तीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक हत्तीला राग आला आणि त्याने विद्यार्थ्याला पायाने हवेत भिरकावलं. यानंतर त्याने सोंडेने ढकलून पायाने चिरडण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी