गणपती डान्सच्या भन्नाट ७ स्टेप्स  !!! 

व्हायरल झालं जी
Updated Sep 18, 2018 | 10:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

गणेशोत्सव म्हटलं की मजा मस्ती आलीच. त्यासोबतच डान्सची धम्माल तर येतेच. आज आम्ही तुम्हांला असाच एक गणपती डान्सचा व्हिडिओ दाखवणार आहोत.  तुम्ही यंदाच्या गणपती विसर्जनला या व्हिडिओतल्या स्टेप्स नक्की करू शकता.

India Vs Foreign - Ganpati Visarjan Dance
गणपती विसर्जन डान्स  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. सोमवारी ५ दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यात गणेशोत्सव म्हटला की, मजामस्ती आलीच. त्यातही सर्वांत महत्त्वाचा म्हणजे गणपती विसर्जनावेळीचा गणपती डान्स... या गणपती डान्समध्ये नॉन डॉन्सर देखील ठेका धरतो. 

गणपती विसर्जनाच्यावेळी लोकं धम्माल, बेफाम नाचत असतात. कशाचाच विचार न करता. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. गणपती डान्सची मज्जाच वेगळी आहे. कोण कसंही डान्स करत असतात. 

गणपती विसर्जनावेळी ढोल ताशे, डीजेच्या तालावर सगळेच ठेका धरतात. या डान्सच्या वेळी कोणालाच थकवा येत नाही. जो तो गणपती डान्सच्या जोशात असतो. 

असाच एक व्हिडिओ आम्ही तुमच्या साठी तयार केला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही गणपती डान्स कसा कराल. याचा हा एक भन्नाट व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये गणपती डान्सच्या भन्नाट ७ स्टेप्स दाखवण्यात आल्या आहेत. 

विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या जोशात तुम्ही गणपती डान्स तर करता त्याच सोबत तुमच्या वेगवेगळ्या गणपती डान्स स्टेप्स पाहण्यासारख्या असतात. हे तुम्हांला माहिती आहे का ? गणपती डान्सच्या स्टेप्स अगदी सोप्या असतात. त्या स्टेप्स कोणीही करू शकतं. 

याचनिमित्ताने आम्ही एक चॅलेन्ज पार केलं आहे. एका परदेशी मुलीला गणपती डान्सच्या स्टेप्स करायला सांगितले. विश्वास नाही बसणार या परदेशी मुलींनं अगदी सहज हे चॅलेन्ज पूर्ण केलं आहे. इंडियन मुलगा विरूद्ध परदेशी मुलगी यांनी गणपती डान्सच्या स्टेप्स करायला सांगितल्या. त्यात दोघांनी मिळून ७ गणपती डान्सच्या भन्नाट स्टेप्स केल्या आहेत. बघुया नेमका कसा केला आहे त्यांनी डान्स.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
गणपती डान्सच्या भन्नाट ७ स्टेप्स  !!!  Description: गणेशोत्सव म्हटलं की मजा मस्ती आलीच. त्यासोबतच डान्सची धम्माल तर येतेच. आज आम्ही तुम्हांला असाच एक गणपती डान्सचा व्हिडिओ दाखवणार आहोत.  तुम्ही यंदाच्या गणपती विसर्जनला या व्हिडिओतल्या स्टेप्स नक्की करू शकता.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola