मुंबई: मध्य प्रदेशचे(madhya pradesh) वरिष्ठ आयपीएल अधिकारी पुरुषोत्तम शर्मा(senior ips officer purushottam sharma) आपल्या दोन व्हिडिओंमुळे(viral video) चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यावर कारवाईही(action) करण्यात आली असून त्यांच्या एडीजी(ADG) पदावरून हटवण्यात आले आहे. तसेच त्यांची बदलीही करण्यात आली आहे. ते पत्नीला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याशिवाय त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे यात एका महिलेच्या घरात असून तेथे त्यांची पत्नी पोहोचते.
येथे पोहोचल्यावर त्यांची पत्नी त्यांना म्हणते हे आहे खरे रूप. यावर शर्मा म्हणतात,खरंच आहे. काय करत आहे. रेप रेला आहे. कोणाच्या घरी बसलो आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. याशिवाय ते त्या दुसऱ्या महिलेला सांगतात की जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा माझी बायको मला चेंज करते.
यानंतर ते म्हणतात की ही माझी लाईफ आहे आणि मी हेच करत राहीन. एवढं बोलून ते घराच्या बाहेर निघून जातात. शर्मा गेल्यानंतर व्हिडिओ बनवणे सुरूच ठेवले जाते आणि त्या महिलेसोबत सवाल करते.
दुसऱ्या व्हिडिओत असे दिसत आहे की शर्मा आपल्या पत्नीला मारहाण करत आहेत. या व्हिडिओत असे दिसतेय की पोलिस अधिकाऱ्यांनी पत्नीला जमिनीवर पाडले आणि त्यांना जोरदार मारहाण केली जात आहे. या दरम्यान घरात काम करणारे कर्मचारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात.
त्यानंतर मीडियासमोर येत पुरुषोत्तम शर्मा म्हणतात, २००८मध्येही माझ्या पत्नीने माझ्याविरोधात तक्रार कली होती मात्र असा सवाल उठतो की २००८ पासून आताप४यंत १२ वर्षांपासून ती माझ्या घरात राहत आहे. माझ्याच पैशाने परदेशात जात आहे. जर माझा स्वभाव असा असता तर आधीच तक्रार आली असती. माझ्या संपूर्ण घरात तिने कॅमेरे लावले आहेत. जर मारहाणाची प्रश्न असता तर सेल्फ डिफेन्सही असतो. मी आणि माझ्या मुलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलेआहे. जर त्यांना वाटत असेल की मी वाईट आहे तर माझ्यावर कारवाई झाली पाहिजे.