कोरोनाबाबत जनजागृती करणाऱ्या कॉलर ट्यूनला 'या' महिलेचा आवाज

Coronavirus Caller Tune: गेल्या काही महिन्यांपासून आपण कोणालाही फोन केला तर कोरोना संदर्भात जनजागृती करणारी कॉलर ट्यून आपल्याला सर्वप्रथम ऐकायला मिळते. मात्र, हा आवाज कोणाचा आहे माहिती आहे का?

Jasleen Bhalla
जसलीन भल्ला  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करणारी कॉलर ट्यून 
  • 'कोविड-१९ से आज पूरा देश लड रहा है' या कॉलरट्यूनला आवाज कोणाचा?
  • कॉलर ट्यून मागचा आवाज जसलीन यांचा

Covid-19 Caller Tune: गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतामध्ये सुद्धा कोरोना बाधितांचा आकडा हा मोठ्या प्रमाणात आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन लावण्यात आला. सरकार, प्रशासनाकडून वारंवार सूचना, मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासोबतच लॉकडाऊन सुरू झाल्यापासून फोनवर कॉलर ट्यूनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. मात्र, या कॉलर ट्यूनला कोणाचा आवाज दिला आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा आवाज कोणाचा आहे.

कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यासाठी कॉलर ट्यूनच्या माध्यमातून एक संदेश देण्यात येत आहे. या कॉलर ट्यूनमधील संदेशात महिलेचा आवाज असून त्यामध्ये म्हटलं आहे, "कोरोना व्हायरस किंवा कोविड १९ सोबत आज संपूर्ण देश लढत आहे. पण लक्षात ठेवा की आपल्याला आजारासोबत लढाई करायची आहे. आजारी व्यक्तींसोबत नाही. रुग्णांसोबत भेदभाव करू नका. त्यांची काळजी घ्या आणि या वाईट काळात आपली ढाल असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी या सर्वांचा सन्मान करा. त्यांना संपूर्ण पणे सहकार्य करा. या योद्धांची काळजी घेतली तर देश जिंकेल आणि कोरोना हरेल. अधिक माहितीसाठी राज्य हेल्पलाईन नंबर किंवा केंद्रीय हेल्पलाईनच्या १०७५ वर कॉल करा. भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी". ही कॉलर ट्यून हिंदीमध्ये आपल्याला सर्वांना ऐकायला येते.

हा आहे आवाजा मागचा चेहरा

कोण आहे जसलीन भल्ला?

कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करणारा हा आवाज आहे वॉईस ओव्हर आर्टिस्ट जसलीन भल्ला (Jasleen Bhalla) यांचा. जसलीन भल्ला या खूपच प्रसिद्ध वॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. जसलीन भल्ला यांनी टीव्ही, रेडिओवर येणाऱ्या विविध जाहिरातींना आपला आवाज दिला आहे. जसलीन भल्ला या दिल्लीत राहतात.

जसलीन भल्ला यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, माझा आवाज इतका प्रसिद्ध होईल आणि कॉलर ट्यून सुद्धा व्हायरल होईल असा कधी विचारही नव्हता केला. इतका व्हायरल कसा झाला हे सुद्धा मला माहिती नाही. माझ्या कुटुंबीयांना याचा खूपच आनंद होत आहे. माझे मित्र, नातेवाईक सुद्धा खूपच कौतुक करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी