Professor Beaten Student: क्षुल्लक कारणानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल 

व्हायरल झालं जी
Updated Mar 20, 2019 | 16:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rajasthan Professor Beaten Student video viral : राजस्थानच्या एका विद्यापीठात विद्यार्थ्यासह त्याच्या नातेवाईकांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Rajasthan viral video
Professor Beaten Student: क्षुल्लक कारणानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल  

Professor Beaten Student In Rajasthan: राजस्थानच्या एका विद्यापीठात एका प्राध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारायला गेलेल्या मुलाच्या नातेवाईकांना देखील विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विद्यापीठाचे कर्मचारी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना वाईट पद्धतीने मारहाण करताना दिसत आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल की, कशापद्धतीने दोघांना ऊसानं आणि लाथाबुक्यानं मारलं जातंय. 

ही घटना राजस्थानमध्ये झुंझुनू जिल्ह्यातल्या झबरमाल टिब्रेवाल विद्यापीठात घडली आहे. तीन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून प्राध्यापकाने एक विद्यार्थी आनंद याला मारहाण केली होती. कोणत्या तरी वादानंतर प्राध्यापकाने विद्यार्थ्याला मारहाण केली असं सांगितलं जात आहे. त्यानंतर मारहाण का केली हे विचारण्यासाठी आनंदचे नातेवाईक विद्यापीठात गेले होते. मंगळवारी आनंद आपले काका आणि चुलत भावासोबत विद्यापीठात गेला. तिथे गेल्यावर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी त्या तिघांनाही मारहाण केली. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात विद्यापीठाचे कर्मचारी ऊसाच्या काठीनं दोघांना मारहाण केली जात आहे. ज्या लोकांनी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांसोबत असं गैरवर्तन केलं त्यात अॅडमिनिस्ट्रेशन इंचार्ज निधी यादवच नाव समोर आलं आहे. घटनेचा जो व्हिडिओ समोर आला आहे त्यात निधी यादव दोन लोकांना मारताना दिसत आहे. त्यासोबतच निधी यादव त्या दोघांना लाथाबुक्यांनी देखील मारत आहे. व्हिडिओमध्ये विद्यापीठातील अन्य स्टाफ देखील त्या दोघांना वाईट पद्धतीनं मारहाण करत आहे.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कायद्या मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्याच दरम्यान विद्यार्थाचा चुलत भाऊ, ज्याला मारहाण केली आहे त्याने आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Professor Beaten Student: क्षुल्लक कारणानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल  Description: Rajasthan Professor Beaten Student video viral : राजस्थानच्या एका विद्यापीठात विद्यार्थ्यासह त्याच्या नातेवाईकांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola