[VIDEO] पाहता पाहता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, तीन मजली इमारत 

Raipur building collapse: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक इमारत पडण्याचा लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे. यात स्पष्ट दिसत आहे की, अचानक इमारत पडत आणि काही क्षणात होत्याची नव्हते झाले. 

live video of collapsing a building in raipurchhattisgarh came forward viral news in marathi
[VIDEO] पाहता पाहता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, तीन मजली इमारत  

नवी दिल्ली :  जर तुम्ही एखाद्या बाजारातून जात असता तर अचानक जर एखादे घर जमीनदोस्त होत असेल तर धक्का बसतो. अशीच काही घटना समोर आली आहे छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये. यातील खमतराई भागात एक तीन मजली इमारत अचानक कोसळली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात स्पष्ट दिसत आहे की काही सेकंदात ही इमारत जमीनदोस्त झाली आहे. 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की रायपूरच्या या भागात बाजार भरतो. या ठिकाणी काही लोक जात होते. अचानक ही इमारत एका बाजूला कलली आणि खाली कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला त्यानंतर परिसरात मोठा धुराळा उडाला. सर्व काही काही सेकंदातच घडले या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. 

या दुर्घटनेबाबत सांगितले जात आहे की, या इमारतीच्या बाजुला एक दुसरी इमारत बांधण्यासाठी खोदण्यात आले होते. त्यामुळेच बिल्डिंग एका बाजूला झुकली आणि नंतर इमारतीच्या पायाला धक्का बसल्याने इमारत जमीनदोस्त झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इमारत पडल्यानंतर बराच काळ या भागात धुरळा उडत होता. आता या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू केले असून या घटनेत ३ जण जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...