धक्कादायक, लॉकडाऊनमुळे झाला बेकार, आग लावून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

Gwalior News: मध्यप्रदेशच्या ग्वालियरमधील एका व्यक्तीने लॉकडाऊनमध्ये कोणतेही काम शिल्लक न राहिल्याने  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. 

madhya pradesh gwalior news a man attempted suicide by immolating himself
 धक्कादायक, लॉकडाऊनमुळे झाला बेकार, आग लावून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न  |  फोटो सौजन्य: Times Now

 ग्वालियर :  एक धक्कादायक घटनेत एका व्यक्तीने मध्यप्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यात स्वतःला पेटवून घेतले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा व्यक्ती ग्वालियरच्या एका हॉटेलमध्ये काम करत होता. लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली होती. त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये होता. गंभीर भाजल्यामुळे त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
 
 संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीसांनुसार, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे या व्यक्तीची नोकरी गेली आहे. त्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. व्हिडिओत तुम्ही पाहू शकतात की या व्यक्तीने स्वतःला आग लावली आहे. काही वेळानंतर एक व्यक्ती ही आग विझविण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अंगावर पाणी फेकतो. 
 
 या प्रकरणी अॅडशनल एसपी यांनी सांगितले की, हे प्रकरण जनक गंज येथील आहे. या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव संतोष आहे. तो एका हॉटेलमध्ये काम करत होता. त्याने आम्हांला सांगितले की, लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालो होतो. माझ्याकडे कोणतेही काम नव्हते. या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी