Digital Bhikari: Paytm द्वारे भीक मागत जमवली लाखोंची संपत्ती, आता हेलिकॉप्टर खरेदीचं करतोय प्लॅनिंग

व्हायरल झालं जी
Updated Aug 10, 2022 | 17:18 IST

Man begging online: सोशल मीडियात सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्यक्ती चक्क ऑनलाईन माध्यमातून भीक मागत आहे. पेटीएमच्या माध्यमातून भीक स्वीकारणाऱ्या या व्यक्तीने लाखोंची संपत्ती जमवली आहे. 

Begging from Paytm video: सध्याच्या या डिजिटलच्या आणि ऑनलाईनच्या जगतात जवळपास सर्वचजण खरेदी केल्यावर ऑनलाईन पेमेंट करताना दिसून येत आहेत. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जेथे भिकारी चक्क पेटीएमच्या माध्यमातून भीक मागत आहे. आश्चर्य वाटतंय ना? पण हे खरं आहे. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील या व्यक्तीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. कारण, हा व्यक्ती भीक मागताना पैसे चक्क पेटीएमवर पेमेंट करायला सांगत आहे. (man begging via paytm online payment digital beggar jhunjhun baba video goes viral watch it)

असं म्हटलं जात आहे की, या व्यक्तीचं वय ८० वर्षे इतके आहे. त्याला टेक्नो फ्रेंडली भिकारी असंही म्हटलं जात आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे सुटे पैसे किंवा कॅश नाहीये असं म्हटल्यावर हा व्यक्ती आपला पेटीएम क्रमांक देऊन त्यावर पेमेंट करायला सांगतो. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या भिकाऱ्याचं नाव झुनझुन बाबा असल्याचं बोललं जात आहे. 

या झुनझुन बाबाच्या बँक खात्यात लाखो रुपये असल्याचं तो सांगत आहे. इतकेच नाही तर भविष्यात आपल्याला हेलिकॉप्टर खरेदी करण्याची इच्छा असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी