झारखंडमध्ये निवडणूक कर्मचारी आहे धोनी, पण...

व्हायरल झालं जी
Updated May 25, 2022 | 17:14 IST

Man Who Look Like Mahendra Singh Dhoni Video Goes Viral : झारखंडमध्ये पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे काम करत असलेला धोनी दिसला. धोनी निवडणुकीचे काम करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि व्हायरल झाला.

थोडं पण कामाचं
  • झारखंडमध्ये निवडणूक कर्मचारी आहे धोनी, पण...
  • धोनी निवडणुकीचे काम करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि व्हायरल झाला
  • या प्रकरणी मीडिया प्रतिनिधींनी चौकशी सुरू केली

Man Who Look Like Mahendra Singh Dhoni Video Goes Viral : झारखंडमध्ये पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे काम करत असलेला धोनी दिसला. धोनी निवडणुकीचे काम करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि व्हायरल झाला. या प्रकरणी मीडिया प्रतिनिधींनी चौकशी सुरू केली आणि खरी माहिती समोर आली. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी नाही तर त्याच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे. या व्यक्तीचे नाव विवेक कुमार आहे. विवेक कुमार महेंद्रसिंह धोनी याचा डुप्लीकेट वाटावा एवढा हुबेहूब दिसतो. तो पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या कामात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत आहे. विवेक कुमार हा सीसीएलमध्ये (Central Coalfields Limited - CCL) 'सहायक प्रबंधक' या पदावर कार्यरत आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी