पंतप्रधान मोदींची मोरासोबत आहे खास मैत्री, शेअर केला खास व्हिडिओ

व्हायरल झालं जी
Updated Aug 23, 2020 | 17:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान मोदींचे निसर्गप्रेम लोकांपासून काही लपलेले नाही. त्याचा उल्लेख त्यांनी याआधीही अनेकदा केला आहे. यावेळी त्यांनी एक असा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ते मोराला खायला देताना दिसत आहेत.

Narendra Modi's special relation with peacock
पंतप्रधान मोदींची मोरासोबत आहे खास मैत्री 

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केली कविता
  • निसर्गप्रेमी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आपले निसर्गप्रेम अनेकदा व्यक्त केले आहे (love for nature) आणि यावेळी त्यांनी असा व्हिडिओ (video) शेअर केला आहे ज्यात ते मोराला दाणे खायला घालताना (feeding peacock) दिसत आहेत. हा व्हिडिओ पंतप्रधानांच्या निवासस्थानातील (video from his residence) आहे जिथे ते आपला राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला दाणे खायला घालत आहेत. हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्टाग्राम अकाऊंटसह ट्वीटरवरही शेअर (shared on Instagram and Twitter account) केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर व्हायरल (video viral) झाला आहे आणि लाखो लोकांनी तो पाहिला आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट केली आहे आणि हा व्हिडिओ शेअरही केला (watched, commented on and shared) आहे.

शेअर केली कविता

या व्हिडिओसह पंतप्रधान मोदींनी एक कविताही शेअर केली आहे जिच्या ओळी अशा आहेत, 'भोर भयो, बिन शोर, मन मोर, भयो विभोर, रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना, मनमोहक, मोर निराला। रंग है, पर राग नहीं, विराग का विश्वास यही, न चाह, न वाह, न आह, गूँजे घर-घर आज भी गान, जिये तो मुरली के साथ जाये तो मुरलीधर के ताज। जीवात्मा ही शिवात्मा, अंतर्मन की अनंत धारा मन मंदिर में उजियारा सारा, बिन वाद-विवाद, संवाद बिन सुर-स्वर, संदेश मोर चहकता मौन महकता।'

निसर्गप्रेमी पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी

आपल्या निवासस्थानात पंतप्रधान मोदींनी खास चबूतरेही बांधून घेतले आहेत जेणेकरून मोरांना तिथे घरटी बांधता येतील. असे चबूतरे ग्रामीण भारतात आढळतात. निसर्गप्रेमी आणि त्याविषयी बोलणारे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. या विषयावर त्यांनी दोन पुस्तकेही लिहिली आहेत. तसेच दीड वर्षांपूर्वी बेअर ग्रिल्स याच्यासोबत ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते आणि त्या माध्यमातून त्यांनी आपले निसर्गाबद्दलचे, पर्यावरणाबद्दलचे विचार लोकांसमोर मांडले होते.

व्हायरल झाला व्हिडिओ

व्हिडिओत दिसत आहे की, पंतप्रधान मोदी आपल्या निवासस्थानी मोराला दाणे घालत आहेत. याशिवाय मोदी फिरायला जातात तेव्हाही मोर सतत त्यांच्या आसपास असतात. ट्वीटरवर हा व्हिडिओ आत्तापर्यंत १ लाख वेळा लोकांनी पाहिला आहे. ही बातमी लिहिली जाईपर्यंत जवळपास २२ हजार लोकांनी लाईक्स व्हिडिओला मिळाले आहेत आणि ६ हजार लोकांनी रीट्वीट केले आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ १५ लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी