Nashik Leopard: दोन बिबट्यांचा नारळाच्या झाडावर थरार, नाशकातील VIDEO VIRAL

व्हायरल झालं जी
Updated Sep 18, 2022 | 13:05 IST

Leopard caught in camera: नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये एका नारळाच्या झाडावर दोन बिबटे पहायला मिळाले. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Nashik Leopard Video: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सांगवी गावात एका झाडावर दोन बिबटे दिसून आले. सिन्नर तालुक्यातील घुमरे कुटुंबियांच्या नारळाच्या झाडावरती दोन बिबट्यांचा थरार बघण्यास मिळाला. हे दोन्ही बिबटे नारळाच्या झाडावरती भांडण करत असल्याचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी मोबाइल कॅमेरात कैद केला आहे. (Nashik two leopards on coconut tree watch video panic situation in sinner Maharashtra)

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेतातील झाडावर तब्बल दोन बिबटे दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच वनविभागाकडून सुद्धा बिबट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी