Navratri Garba: नवरात्रोत्सवात गरब्याचा जल्लोष; ड्रोनच्या सहाय्याने टिपलेली ही दृश्य पाहाच

व्हायरल झालं जी
Updated Oct 02, 2022 | 15:09 IST

Garba visual drone video: सर्वत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवात अनेक ठिकाणी दांडिया आणि गरब्याचे आयोजन करण्यात येत असते. अशाच एका गरब्याची दृश्य ड्रोनच्या सहाय्याने टिपली आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Garba drone video viral: नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. या नऊ दिवसांच्या काळात दुर्गा मातेची भाविक मनोभावे पूजा करतात. तर रात्रीच्या वेळी सर्वत्र गरबा किंवा दांडियाचे आयोजन करण्यात येते. गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी तरुण-तरुणींमध्ये खूपच उत्साह असतो. (Navratri 2022 dandia people celebrating garba gujarat watch drone video goes viral)

गुजरातमध्ये तर गरबा आणि दांडिया खेळण्यात एक वेगळीच मजा असते. गुजरातमधील वड़ोदरा येथील मेला ग्राऊंडमध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी होत दांडिया, गरबा खेळतात. याच ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने गरब्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही एकदा पहाच...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी