Watch Video: क्रूरता ! ८० वर्षांच्या सासूला सुनेची मारहाण 

व्हायरल झालं जी
Updated Jun 09, 2019 | 10:57 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला दुसऱ्या वयोवृद्ध महिलेला बेदम मारहाण करताना दिसत आहे. मारहाणीचा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

thrashes 80-year-old mother-in-law
Watch Video: क्रूरता ! ८० वर्षांच्या सासूला सुनेची मारहाण  

Thrashes 80-year-old mother-in-law in Mahendragarh district of Haryana: गेल्या दोन दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक महिला एका वयोवृद्ध महिलेला बेदम मारहाण करताना दिसत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना हरियाणामधली असल्याचं उघड झालं आहे. हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौलमध्ये एक ८० वर्षांची वृद्ध महिलेला बेदम मारहाणा केल्याची घटना समोर आली. मारहाण करणारी महिला ही वृद्ध महिलेची सून असल्याचं समजतं आहे. या वृद्ध महिलेचं नाव चांद बाई आहे. 

या व्हिडिओत चांद बाई घराच्या बाहेर असलेल्या बेडवर बसली आहे. यावेळी तिची सून चांद बाई यांनी धक्का देताना दिसतं त्यांचे केस ओडताना दिसतेय. नंतर त्यांचा एक पाय जोरात उचलून आपटते.  या सूनेचं नाव कांता देवी आहे. शेजारच्या एक मुलीनं या मारहाणीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत ८० वर्षांच्या सासूला मारहाण करणाऱ्या तिच्या क्रूर सूनले पोलिसांनी अटक केली आहे. 

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की, सभ्य समाजात अशा प्रकारचे वर्तन सहन करता येऊ शकत नाही. खट्टर यांनी ट्विट केलं की, या प्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. 

नारनौलचे पोलीस अधिक्षक चंद्र मोहन यांनी सांगितलं की, आरोपी वृद्ध महिलेची  वृद्ध काळजी घेऊ शकत नाही. वृद्ध महिला एक ओझं असल्याचं आरोपी सांगते. त्यासाठी त्यांना आरोपीनं मारहाण केली. पोलिसांनी सांगितले की, विधवा असलेल्या चांद बाई यांचे पती सीमा सुरक्षा दलात सहायक उपनिरीक्षक होते. त्यांना सरकारकडून ३० हजार रूपयांची पेन्शन सुद्धा मिळते. 

पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, कांता देवी यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार 323 आणि 506 अन्वये हा खटला दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पीडित महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर मेडिकल तपासणी करण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी