काळजाचा थरकाप करणारा अपघात, चेकपोस्ट टाळण्यासाठी पळवली बाईक, एकाचा जागीच मृत्यू 

व्हायरल झालं जी
Updated May 24, 2021 | 17:14 IST

तेलंगणा राज्यातील मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये एक धडकी भरविणारा अपघात घडला.  चेकपोस्टवर तपासणी टाळण्यासाठी दोन तरूणांनी भरधाव वेगाने चेकपोस्ट खालून जाण्याचा निर्णय घेतला पण तो त्यातील एकाच्या जीवावर बेतला

थोडं पण कामाचं

  •  तेलंगणा राज्यातील मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये एक धडकी भरविणारा अपघात घडला.  
  • चेकपोस्टवर तपासणी टाळण्यासाठी दोन तरूणांनी भरधाव वेगाने चेकपोस्ट खालून जाण्याचा निर्णय घेतला पण तो त्यातील एकाच्या जीवावर बेतला.
  • दोनपैकी मागे बसलेल्या एका तरूणाचा जागीच  मृत्यू झाला आहे.

तेलंगणा :  तेलंगणा राज्यातील मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये एक धडकी भरविणारा अपघात घडला.  चेकपोस्टवर तपासणी टाळण्यासाठी दोन तरूणांनी भरधाव वेगाने चेकपोस्ट खालून जाण्याचा निर्णय घेतला पण तो त्यातील एकाच्या जीवावर बेतला. दोनपैकी मागे बसलेल्या एका तरूणाचा जागीच  मृत्यू झाला आहे. या काळजाचा थरकाप उडविणाऱ्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये वन विभागाचा चेकपोस्ट आहे. या चेकपोस्टला वन अधिकार वाहनांची तपासणी करत होते. 22 मे ला दोन तरूण एका बाईकवरून अतिशय वेगाने येत होते. त्यावेळी वन अधिकाऱ्याने हातवारे करून त्यांना थांबण्याची सूचना केली. मात्र तरीही दुचाकीस्वारानी वेग कमी केला नाही. उलट त्याने चेकपोस्टवरील तपासणी टाळण्यासाठी आपला वेग आणखी वाढवला. हे अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी चेकपोस्टवर शक्य तितक्या वर नेण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांनी वर केलेल्या चेकपोस्टखालून गाडी चालवत असलेल्या तरूणाने आपली मान खाली केली. त्यामुळे मान खाली केलेला तरूण वाचला खरा पण त्याच्या मागे बसलेल्या अंदाज आला नाही आणि त्यामुळे तो चेकपोस्टला धडकला. ही धडक इतकी जोरात होती की त्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. सुदावेनी व्यंकटेश गौड अशी मृत तरूणाची ओळख पटली आहे. 

दरम्यान, दुचाकी चालवत असलेला तरूणाचं नाव बंडी चंद्रशेखर असून तो कोत्थाकुम्मूगुदेम गावाचा रहिवासी आहे. दुचाकी चालवणाऱ्या तरूणाने गाडी थांबवली असती तर अपघात झाला नसता आणि मागे बसलेल्या सुदावेनीचा दुर्दैवी अंत झाला नसता. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी