[VIDEO] दोन महिलांना भररस्त्यात मारहाण, कारण ऐकून बसेल धक्का

पंजाबच्या फरीदकोटच्या कोटकपुरा भागात दोन महिलांना पुरूषांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 

two women thrashed
[VIDEO] दोन महिलांना भररस्त्यात मारहाण, कारण ऐकून बसेल धक्का  |  फोटो सौजन्य: Times Now

चंदीगडः पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यातील कोटकपुरामध्ये शनिवारी ६ जुलैला भररस्यात पुरूषांच्या एका समूहानं दोन दलित महिलांवर हल्ला केला. जेव्हा या पुरूषांकडून मारहाण केली जात होती, तेव्हा स्थानिक लोकं या मारहाणीची मजा घेत होते आणि केवळ बघ्याची भूमिका करत होते. पोलिसांनी या मारहाणी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे आणि या प्रकरणी एससी/एसटी छळ कायदा लागू करण्यात आला आहे. पंजाब महिला आयोगानं फरीदकोट जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांना (SSP) या घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. 

व्हिडिओमध्ये पुरूष भररस्त्यात महिलांना क्रूरपणे मारताना दिसत आहेत. दोन्ही महिला स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महिलांनी आरोप लावले आहेत की, आम्ही एक फोटोग्राफी कार्यशाळेत जात होतो. तेव्हा आम्हाला दिसलं की काही लोकं आमच्या दुकानातीला सामान काढून बाहेर फेकत होते. त्यावेळी या महिलांनी यावर आक्षेप घेताच आरोपींनी आम्हाला मारहाण करण्यास सुरूवात केली. 

फरीदकोटच्या एसपी गुरमीत कौर यांचं म्हणणं आहे की, व्हायरल व्हिडिओच्या आधारावर एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हा वाद संपत्तीशी संबंधित आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महिलांनी आरोप लावले आहेत की, आरोपी हे अकली दलाचे समर्थक होते. हे कार्यकर्ते आमच्या दुकानाची तोडफोड करण्यासाठी आले होते. एका पीडितानं सांगितलं की, माझा पती हा माझ्या सासऱ्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. माझा सासऱ्यांचं निधन झालं. त्यासाठी संपत्तीचा वाद पहिली पत्नीचे मुलं आणि माझ्या कुटुंबात सुरू आहे. सध्या कोर्टात हे प्रकरण सुरू आहे. जेव्हा मी तिथे पोहोचली, तर मी पाहिलं की सुखदेव सिंह(आरोपी) आमच्या दुकानातून सामना काढत होता. जेव्हा मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यानं मला मारहाण करण्यासा सुरूवात केली. मला आणि माझ्या कुटुंबियातील सदस्यांना दुकानातून बाहेर खेचत होता. त्यानं आणि त्याच्या साथीदारानं माझे केस खेचले, शिवीगाळ केली आणि आम्हाला वाईट पद्धतीनं मारहाण केली. जेव्हा आम्ही आरडाओरड करण्यास सुरूवात केली तेव्हा आमचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकं गोळा झाली. तेव्हा ते तिथून पळून गेले आणि आमच्या दुकानातील दोन कॅमेरे घेऊन गेले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO] दोन महिलांना भररस्त्यात मारहाण, कारण ऐकून बसेल धक्का Description: पंजाबच्या फरीदकोटच्या कोटकपुरा भागात दोन महिलांना पुरूषांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola