नेहरूंच्या पुतळ्याला हार घालण्यावरुन काँग्रेसमध्ये भांडण

व्हायरल झालं जी
Updated May 28, 2021 | 13:02 IST

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला हार घालण्यावरुन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भांडण झाले.

थोडं पण कामाचं
  • नेहरूंच्या पुतळ्याला हार घालण्यावरुन काँग्रेसमध्ये भांडण
  • राजस्थानमधील घटना
  • व्हिडीओ झाला व्हायरल

अलवर: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला हार घालण्यावरुन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भांडण झाले. नगर परिषदेच्या अध्यक्षा वीणा गुप्ता आणि कार्यकारी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष योगेश मिश्रा यांच्यापैकी हार कोणी सर्वात आधी घालायचा या मुद्यावरुन भांडण झाले. Rajasthan: Congress fights Congress over garlanding Nehru's Statue in Alwar

कहर म्हणजे हार घालण्यावरुन झालेल्या वादात वीणा गुप्ता यांनी घटनास्थळी उपस्थित पत्रकारांना ओढले. शिष्टाचारानुसार मीच नेहरूंच्या पुतळ्याला हार सर्वात आधी घालायला हवा की नाही, असा प्रश्न विचारत वीणा गुप्ता यांनी स्वतःची बाजू योग्य असल्याचे योगेश मिश्रा यांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला. वाद विकोपाला गेला आणि वीणा गुप्ता यांनी योगेश मिश्रा यांना तिरकस टोमणे मारले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

अलवरच्या जुन्या पीआयबी ऑफिससमोर नेहरूंचा पुतळा आहे. या ठिकाणी गुरुवारी २७ मे २०२१ रोजी नेहरूंच्या पुण्यतिथी निमित्त पुतळ्याला हार घालण्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर योगेश मिश्रा यांनी सर्वात आधी पुतळ्याला हार घातला. मिश्रांच्या या कृतीवरुन वाद झाला. 

शिष्टाचारानुसार कार्यक्रमाला उपस्थित वरिष्ठ लोकप्रतिनिधी या नात्याने आपण आधी पुतळ्याला हार घालणे अपेक्षित होते. यानंतरच मिश्रांनी पुतळ्याला हार घातला पाहिजे होता; असे नगर परिषदेच्या अध्यक्षा वीणा गुप्ता यांचे म्हणणे होते. तर कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसने केले होते. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यक्रमात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पहिला मान मिळतो. याच पद्धतीने जिल्हा पातळीवर नेहरूंच्या पुतळ्याला पहिला हार घालण्याचा मान माझाच असल्याचा दावा करत योगेश मिश्रा यांनी स्वतःच्या कृतीचे समर्थन केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी