रक्षाबंधन स्पेशल रांगोळी

व्हायरल झालं जी
Updated Aug 21, 2021 | 10:53 IST

Raksha Bandhan Rangoli Design भारतात दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करतात. देशाच्या काही भागांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी घराच्या दाराजवळ रांगोळी काढण्याची प्रथा आहे.

थोडं पण कामाचं

  • हिंदू पंचागानुसार हा सण श्रावण महिन्याच्या पोर्णिमा तिथीला साजरा केला जातो.
  • या पोर्णिमेला राखी पोर्णिमा असे म्हणतात
  • यावर्षी हा सण २२ ऑगस्ट २०२१ला साजरा केला जाणार आहे

Raksha Bandhan 2021 Rangoli Design video: भारतात दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करतात. देशाच्या काही भागांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी घराच्या दाराजवळ रांगोळी काढण्याची प्रथा आहे.हा भावाबहिणींचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला ओवाळते आणि नारळाची वडी गोड म्हणून खाऊ घालते. भाऊ ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू देतो. भावाने कायम ठामपणे आपल्या पाठिशी उभे राहावे, आपले रक्षण करावे यासाठी बहीण भावाला राखी बांधते. राखी बांधताना बहीण भावाच्या दिर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ बहिणीच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करतो. अनेकांचा असा विश्वास आहे की, मनगाटवर बांधलेल्या राखीमुळे भावाचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. त्याला कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची बुद्धि होते.

हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पोर्णिमा या तिथीला साजरा केला जातो. या पोर्णिमेला राखी पोर्णिमा असे म्हणतात. यंदाच्या वर्षी हा सण २२ ऑगस्ट २०२१ला साजरा केला जाणार आहे. 

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भगवान श्रीकृष्ण यांची पूजा करतात. भावाचे सर्व काही चांगले व्हावे यासाठी प्रार्थना करतात. दाराजवळ काढलेल्या आकर्षक रांगोळीमुळे रक्षाबंधनाच्या दिवशी संबंधित घरावर लक्ष्मीची कृपा होते. घरात संपन्नता आणि आनंद कायम राहतो. यासाठीच रक्षाबंधनाच्या दिवशी साधी, सोपी आणि आकर्षक रांगोळी काढण्याची प्रथा आहे. 

Narali Purnima 2021 Wishes: नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes, Images 

Raksha Bandhan 2021: या रक्षाबंधनला ४७४ वर्षांनी आला अद्भुत मोठा योगायोग, पूर्ण होणार लोकांची सर्व इच्छा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी