धक्कादायक! शाळेला बनवलं मसाज पार्लर, शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांकडून शिक्षिका मालिश करुन घेते, Video व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Jul 28, 2022 | 16:16 IST

Viral Video shows child massaging Teacher hand in school: शाळेतील शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांकडून मसाज करुन घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Woman teacher massage by student video goes viral: सोशल मीडियात अनेक व्हिडिओज किंवा फोटोज व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा धक्काच बसतो आणि आपल्या डोळ्यांवर विश्वासही बसत नाही. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्या दिसत आहे की, एक महिला टीचर शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी त्यांच्याकडून आपला मसाज करुन घेत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. (School student massaging woman teacher in up video goes viral)

हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील हरदोई येथे घडला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, शिक्षिका एका खुर्चीवर बसल्या आहेत आणि एका विद्यार्थ्याला मसाज करायला सांगत आहे. हा विद्यार्थी शिक्षिकेच्या हाताला मसाज करताना दिसून येत आहे.

इतकेच नाही तर जर एखाद्या विद्यार्थ्याने मसाज करण्यापासून नकार दिला तर त्यांना शिक्षिका धमकावत आहे. असं म्हटलं जात आहे की, एका सरकारी शाळेतील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा प्रकार समोर आल्यावर संबंधित महिला शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी