Viral Video : सातारा जिल्ह्यात स्कूल व्हॅनला आग

School van caught fire in Satara district viral video : सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथील हायस्कूलच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला आग लागली.

School van caught fire in Satara district viral video
सातारा जिल्ह्यात स्कूल व्हॅनला आग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Video : सातारा जिल्ह्यात स्कूल व्हॅनला आग
  • आग लागल्यामुळे स्कूल व्हॅन जळून खाक
  • व्हॅनमध्ये शेडगेवाडी येथील 8 ते 10 विद्यार्थी होते

School van caught fire in Satara district viral video : सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथील हायस्कूलच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला आग लागली. आग लागल्यामुळे स्कूल व्हॅन जळून खाक झाली. ही घटना लोणंद शिरवळ रोडवरील शेडगेवाडी फाट्याजवळ घडली.

ज्या स्कूल व्हॅनला आग लागली ती सीएनजीवर (CNG) चालवली जात होती. व्हॅनमध्ये शेडगेवाडी येथील 8 ते 10 विद्यार्थी होते. चालकाने प्रसंगावधान राखून सर्व विद्यार्थ्यांना व्हॅनमधून सुरक्षित बाहेर काढले. यामुळे स्कूल व्हॅनला आग लागली तरी चालक आणि विद्यार्थी सुरक्षित आहेत. जीवितहानी झालेली नाही. पण ताज्या घटनेमुळे शाळा व्यवस्थापन, पालक आणि विद्यार्थी यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.

Mumbai : Central Railway Timetable : मध्य रेल्वे मार्गावरील या उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळांमध्ये बदल, बघा टाईमटेबल

Hydrogen Buses in India: भारतात चालणार हायड्रोजन बसेस, धुराऐवजी सोडणार पाणी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी