[Shocking Video]  जेवणासाठी भांडण करताना दिसले प्रवासी मजूर 

Fight for Food at Katihar Railway Station Shocking Video: लॉकडाऊनमुळे रोजगारासोबत दोन वेळच्या खाण्याचे वांदे झाले. जेवणासाठी व्याकूळ झालेल्या मजूराचा बिहारमध्ये एक शॉकिंग व्हिडिओ समोर आला आहे. 

starving migrants fight for food at katihar railway station biharwatch video national news in marathi
[Shocking Video]  जेवणासाठी भांडण करताना दिसले प्रवासी मजूर   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला.
  • देशाच्या विविध भागात प्रवासी मजूर (Migrants)अडकले आहेत. त्यांची परिस्थिती खूप बिकट झाली आहे.
  • एका चपातीसाठी त्यांचा संघर्ष दिवसेंदिवस खूप कठीण होत चालला आहे. अनेक मजूर अनेक दिवसांपासून उपाशी आहेत. 

कटिहार :  कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे देशाच्या विविध भागात प्रवासी मजूर (Migrants)अडकले आहेत. त्यांची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. त्याचा रोजगार तर गेला आणि आता त्याच्या जीव मरणाचा प्रश्न आव वासून उभा आहे. एका चपातीसाठी त्यांचा संघर्ष दिवसेंदिवस खूप कठीण होत चालला आहे. अनेक मजूर अनेक दिवसांपासून उपाशी आहेत. 

या सर्व परिस्थितीत बिहारच्या भुकेलेल्या प्रवासी मजूरांचा एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video)  समोर आला आहे. किती भयाण परिस्थिती  याचं वास्तव चित्र यात दिसत आहे. कटिहार रेल्वे स्टेशनवर भूकेने व्याकूळ झालेल्या प्रवाशांनी मिळालेल्या भोजनावर अक्षरशः हल्लाबोल केला. 

यात व्हिडिओत आपण पाहू शकतो की कटिहार रेल्वे स्टेशनवर जेवणाची पॅकेट मिळविण्यासाठी हताश आणि भुकेलेले प्रवास एकमेकांशी भांडण करताना आणि झटापट करताना दिसत आहे. 

हा जो व्हिडिओ समोर आला आहे. यात रेल्वे स्टेशनवर अनेक मजूर प्रवासी जेवणाचे पॅकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकार खूप दावे करीत आहे की गरीब आणि प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना कोणतीही कमतरता झालेली नाही. पण या व्हिडिओमध्ये दुसरा पैलू समोर येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी