vehicle swept away in flood: भारतातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान राजस्थानमधील कोटा येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वच अवाक् झाले. व्हिडिओत एक गाडी पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहे. (suv swept away in flood of kota area video goes viral watch it)
मुसळधार पावसामुळे एका नदीला पूर आला होता. नदीवरील पुलावरुनही पाणी ओसंडून वाहत होते त्याच पाण्यातून एका वाहन चालकाने गाडी नेण्याचा प्रयत्न केला आणि त्या पाण्यात गाडी अडकली आणि त्यानंतर पाण्याच्या प्रवाहात गाडी वाहून गेली. ही संपूर्ण घटना तेथील काही नागरिकांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.