बसच्या छतावरून कोसळले २५ ते ३० विद्यार्थी, साजरा करत होते बस डे, पाहा व्हिडिओ 

व्हायरल झालं जी
Updated Jun 18, 2019 | 13:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

तामिळनाडूतील चेन्नईच्या एका कॉलेजमधील काही विद्यार्थी 'बस डे' साजरा करत होते, या दरम्यान, काही जण बसच्या टपावर चढले, नंतर काय झाले ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहा... 

channai student bus day
बसच्या छतावरून कोसळले २५ ते ३० विद्यार्थी, साजरा करत होते बस डे  |  फोटो सौजन्य: Times Now

चेन्नई :  तामिळनाडूतील चेन्नई येथे एक धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. येथील पचैयप्पा कॉलेजचे काही विद्यार्थी एकत्र येऊन 'बस डे' साजरा करत रस्त्यावर एक रॅली काढली होती. यावेळी ते चालत्या बसच्या छतावर जाऊन डान्स करायला लागले. तसेच बसच्या छतावर जाऊन जल्लोष करतो हुडदंग माजवायला लागले. त्यावेळी बसने ब्रेक मारला आणि छतावर मस्ती करणारे आणि आरडाओरडा करणारे २५ ते ३० मुले अचानक सुमारे २५ फुटांवरून खाली कोसळले. 

या घटनेमुळे चेन्नईच्या रस्त्यावर काही काळ ट्रॅफिक जाम झाली होती. त्यांच्या या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला. यात स्पष्टपणे दिसते आहे की काही विद्यार्थी खिडकीच्या बाहेर डोके काढून आरडाओरडा करताना दिसत आहे, तसेच बसच्या छतावरील विद्यार्थीही त्यांना साथ देत मस्ती करताना दिसत आहेत. 

तर काही जण बसच्या समोर सेल्फी घेताना दिसत आहेत. त्यात बसचा ब्रेक लागल्यावर बॅलेन्स गेल्यावर एकमेकांवर आदळून काही जण खाली कोसळले. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत विद्यार्थ्याविरूद्ध जीवघेणा स्टंट केल्या प्रकरणी कारवाई करण्यास सांगितले आहे. 

 

या बाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस डे साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसच्या छतावर जाऊन जल्लोष करण्यास वारंवार मज्जाव करण्यात आला होता. तरही त्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली. पोलिसांनी या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी सांगितले की, बसच्या ड्रायव्हरने ब्रेक मारल्यावर बसच्या छताच्या किनाऱ्यावर बसलेले काही विद्यार्थी झटका लागल्याने त्यांचा तोल गेला आणि ते समोरच्या बाजूला रस्त्यावर कोसळले. यातील काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या असून कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. चेन्नई पोलिसांनी कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बसच्या छतावरून कोसळले २५ ते ३० विद्यार्थी, साजरा करत होते बस डे, पाहा व्हिडिओ  Description: तामिळनाडूतील चेन्नईच्या एका कॉलेजमधील काही विद्यार्थी 'बस डे' साजरा करत होते, या दरम्यान, काही जण बसच्या टपावर चढले, नंतर काय झाले ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहा... 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola