[VIDEO]: वयोवृद्ध दाम्पत्याची लढाई, चोरांची झाली धुलाई

एका वयोवृद्ध दाम्पत्याने चोरी करण्यासाठी आलेल्या दोन चोरांची चांगलीच धुलाई केली आहे. ही संपूर्ण घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

tamil nadu couple fight robbers
वयोवृद्ध दाम्पत्याने केली चोरांची धुलाई 

थोडं पण कामाचं

  • दाम्पत्याने चोरांना लावले पिटाळून
  • दाम्पत्याची लढाई कॅमेऱ्यात कैद
  • चोरांसोबतच्या लढाईचा व्हिडिओ व्हायरल
  • तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील घटना

Elderly Couple fights robbers: वयोवृद्ध दाम्पत्याला, महिलांना किंवा लहान मुलांना पाहून चोर, दरोडेखोर त्यांना लुटतात असं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे सर्वांनाच लढण्याची एक नवी प्रेरणा मिळेल. झालं असं की, तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यात राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या घरात चोरी करण्यासाठी चोरट्यांनी प्रवेश केला. चोरांना पाहून हे दाम्पत्य घाबरलं नाही तर त्यांनी थेट या चोरांवरच हल्ला चढवला.

दोन चोरट्यांनी या दाम्पत्याच्या घरात चोरी करण्याचा डाव आखला होता. चोरी करण्यासाठी सशस्त्र दोन चोरांनी दाम्पत्याच्या घराबाहेर एन्ट्री केली आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील या वयोवृद्ध दाम्पत्याने न घाबरता चोरांशी दोन हात केले. या दाम्पत्याने आपल्या शेजारी असलेली प्लास्टिकची खुर्ची, स्टूलच्या सहाय्याने या चोरांवर हल्ला चढवला. या दोन्ही चोरांच्या हातात शस्त्र होती मात्र त्या शस्त्रांना दाम्पत्य घाबरलं नाही आणि चोरांना चोख प्रत्युत्तर दिलं. 

चोरांसोबत सुरू असलेली दाम्पत्याची ही लढाई घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दाम्पत्याच्या या लढाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, महिला आणि तिचा पती प्लास्टिकच्या खुर्चीने चोरांना मारहाण करत आहेत. चोरांना मारहाण करताना त्या दाम्पत्याच्या हातातील खुर्ची आणि स्टूल सुद्धा तुटतात.

दोन्ही चोरांच्या हातात कोयता असल्याचं दिसत आहे. प्रथम महिला त्या चोराला धक्का देते आणि त्यानंतर महिलेचा पती त्यापैकी एका चोराला खुर्चीने मारहाण करण्यास सुरूवात करतो. त्याच दरम्यान खुर्ची तुटले तेव्हा ती महिला प्लास्टिकचा स्टूल घेते आणि त्या चोराला मारहाण करते. दाम्पत्याकडून चोरांवर होत असलेला हल्ला पाहता त्या चोरांनी हार मानली आणि तेथून पळ काढला. दाम्पत्याने चोरांवर हल्ला चढवत त्यांना पळवून लावलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दाम्पत्याचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

गुरुग्राममध्ये घडली होती अशीच घटना

ऑक्टोबर २०१७ मध्ये गुरुग्राममध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती. तेथील एका दुकानाच्या मालकाने दरोडेखोरांसोबत दोनहात करत दरोडा रोखला आणि सोबतच दुकानातील दोन ग्राहकांचे प्राण सुद्धा वाचवले होते. हा संपूर्ण प्रकार सुद्धा दुकानात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. आरोपीने दुकानात प्रवेश करतात आणि दरोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दुकानदाराने त्या दरोडेखोराला चांगलाच धडा शिकवत पिटाळून लावलं होतं.

झालं असं होतं की, दुकानात एक वयोवृद्ध महिला आणि मुलगा उपस्थित होते. त्याच दरम्यान दुकानात आलेले दोन ग्राहक आपल्या वस्तू खरेदी करण्यात बीझी होते. हे सर्व सुरळीत सुरू असताना दोन दरोडेखोर दुकानात प्रवेश करतात आणि आपल्याकडील पिस्तूलचा दाख दाखवत लुटण्याचा प्रयत्न करतात. मातर्, दुकानदाराने त्या दरोडेखोरांना न घाबरता त्याला विरोध करताना व्हिडिओत दिसतं.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...