कराटे स्टंट करताना भाजून मृत्यू

तामिळनाडूतील पुदुकोट्टई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. कराटे स्टंटचे प्रात्यक्षिक सुरू असताना भाजल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव बालाजी असे आहे.

Tamilnadu Karate Stunt: Karate stunts had to be done in a heavy, painful accident, the young man died
कराटे स्टंट करताना भाजून मृत्यू 

थोडं पण कामाचं

  • कराटे स्टंट करताना भाजून मृत्यू
  • तामिळनाडूतील पुदुकोट्टई जिल्ह्यातील घटना
  • व्हिडीओ व्हायरल

पुदुकोट्टई: तामिळनाडूतील पुदुकोट्टई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. कराटे स्टंटचे प्रात्यक्षिक सुरू असताना भाजल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव बालाजी असे आहे. या घटनेचा व्हिडीओ 'टाइम्स नाउ नवभारत'च्या हाती आला आहे. हा व्हिडीओ आपल्याला विचलित करू शकतो. Tamilnadu Karate Stunt: Karate stunts had to be done in a heavy, painful accident, the young man died

पुदुकोट्टई जिल्ह्यातील एका मैदानावर कराटे स्टंटचे प्रात्यक्षिक सुरू होते. हातावर कापड बांधून त्याला आग लावण्यात आली. स्टंट करणारा बालाजी हात वेगाने फिरवत एका ठिकाणी येऊन जळत्या हातांनी विटा आणि कौलं फोडण्याचा स्टंट करणार होता. पण याच सुमारास जोरदार वारा वाहू लागला. वाऱ्याच्या झोतामुळे हातावर बांधलेल्या कापडावरील आगीच्या ज्वाळांचा बालाजीच्या कपड्यांना स्पर्श झाला आणि क्षणार्धात  भडका उडाला. 

मैदानात उपस्थित असलेल्यांनी आग विझवून बालाजीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण भाजून झालेल्या जखमांमुळे बालाजीची प्रकृती वेगाने खालावली. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली पण त्यांना यश मिळाले नाही. भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या बालाजीने हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेने अनेकांना धक्का बसला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी