आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांना पोलिसांनी मारली लाथ, बघा व्हिडिओ

Telangana viral video: तेलंगणामधून पोलिसांच्या क्रौर्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका पोलिस कर्मचाऱ्यानं अशा मुलीच्या वडिलांना लाथ मारली,  ज्या मुलीने आत्महत्या केली आहे. 

Telangana viral video
आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांना पोलिसांनी मारली लाथ, बघा व्हिडिओ 

तेलंगणाः   तेलंगणामधून पोलिसांच्या क्रौर्याचा व्हिडिओ समोर आला आहे. येथे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिंनीच्या वडिलांसोबत पोलिसांनी गैरवर्तन केलं आहे. एक पोलीस कर्मचारी तिच्या वडिलांना लाथ मारताना दिसत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याच्या या कृत्याचा सगळीकडून निषेध व्यक्त करण्यात येतं आहे. 

संगारेड्डीमध्ये नारायण कॉलेजची विद्यार्थिंनी संध्या रानीनं सोमवारी संध्याकाळी आत्महत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह संगा रेड्डी जिल्ह्याच्या पाटनचेरूच्या एका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला होता. व्हिडिओमध्ये बघू शकता की, पोलीस मुलीचा मृतदेह घेऊन जात होते, तेव्हा मुलीचे वडील पोलिसांच्या मध्येच येतात आणि त्यांना थांबवतात. त्यानंतर काही पोलीस त्यांच्याजवळ येतात आणि त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक पोलीस त्यांना लाथ मारतो. मृत मुलीचे वडिल एस. चंद्रशेखर यांनी महाविद्यालयीन व्यवस्थापनाविरूद्ध दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते पोलिसांकडून त्यांच्या मुलीचा मृतदेह मागत होते.

या घटनेविषयी बोलताना संगारेड्डी जिल्ह्यातील एसपी चंदना दीप्ती यांनी सांगितले, मुलीनं परवा आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह शवपेटीत होता. त्यावेळी काही आंदोलकांनी आणि तिच्या नातेवाईकांनी शवपेटीची काच फोडली. वाहतूक थांबवण्यासाठी मृतदेह मुख्य रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिसांनी मृतदेह पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला आणि या प्रक्रियेत तिच्या वडिलांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांना लाथ मारली. व्हिडिओची तपासणी केली असून कारवाई सुरू केली आहे. 

पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल याची हमी त्यांनी दिली. पुढे त्या म्हणाल्या की, आंदोलनकर्त्यांना कायदा हातात घेण्यापासून पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तरीही अधिकाऱ्यांनी ऑन ड्युटी केलेल्या कोणत्याही गैरवर्तनासाठी योग्य ती कारवाई केली जाईल.

बीडीएल भानूर पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर राम रेड्डी यांनी घटनेस दुर्दैवी म्हटले आणि म्हणाले की, व्हिडिओ क्लीपिंगमध्ये ही घटना कोणत्या कारणास्तव घडली हे दाखवलं गेलं नाही आहे. ते म्हणाले, आमच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यांनी शवपेटीचा दरवाजा उघडला आणि जबरदस्तीनं मृतदेह  बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना मृतदेह महाविद्यालयाच्या वसतिगृहात घेऊन जायचा होता आणि न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं. आम्हाला त्यांच्याकडून मृतदेह परत घ्यावा लागला आणि त्या प्रक्रियेत ही दुर्घटना घडली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...