हे आहेत वाॅटर मॅन शंकरलाल, कडक उन्हात सायकलवरून फिरुन भागवतात लोकांची तहान, VIDEO व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated May 06, 2022 | 16:22 IST

Water Man Shankar lal: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी शंकर लाल गेल्या २६ वर्षांपासून लोकांची तहान भागवत आहेत. ते नर्मदा नदीतून रोज पाणी आणतात आणि सायकलवरून फिरुन लोकांना पाणी पाजतात.

Water Man Shankar lal Video: अनेकदा तुम्ही लोकांच्या तोंडून ऐकले असेल की पाणी पिजणे हे पुण्याचं काम आहे. या उक्तीप्रमाणे आजूबाजूला फिरून लोकांची तहान भागवणारी एक व्यक्ती आहे आणि ती जलपुरुष म्हणून ओळखली जाते. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीचे नाव शंकरलाल सोनी असून ते मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये कडक उन्हात लोकांची तहान भागवत आहेत. शंकरलाल गेल्या २६ वर्षांपासून हे काम करत आहेत. यावेळी ते लोकांना पाणी बचतीचा संदेशही देतात. शंकरलाल रोज सकाळी सायकलने नर्मदा नदीवर जातात आणि सुमारे 100 लिटर पाणी भरतात आणि लोकांची तहान भागवण्यासाठी निघतात. पाणी संपले की ते पुन्हा नर्मदा नदीपर्यंत पोहोचतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी