भारीच... 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला तब्बल ७० कोटींचा बोनस, पाहा VIDEO

व्हायरल झालं जी
Updated Dec 13, 2019 | 12:49 IST

पाकिट उघडल्यावर त्यात चक्क ख्रिसमसनिमित्त तुम्हाला कंपनीकडून ५० हजार डॉलर्सचा बोनस मिळत आहे असे लिहिले होते. कंपनीने दिलेल्या या सरप्राईज गिफ्टबाबत सर्वच कर्मचारी खूप आनंदी होते.

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेतील सेंट जॉर्न प्रॉपर्टीज ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रातील नावाजलेली कंपनी आहे.
  • कंपनी मालकांनी दिलेले टार्गेट यशस्वीरित्या पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांना हा भरघोस बोनस दिल्याचे सांगितले आहे.
  • बोनस म्हणून देण्यात आलेल्या या रकमेचा एकूण आकडा १७ कोटी एवढा आहे.

अमेरिकेतील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भरगच्च ख्रिसमस बोनस दिला आहे. होय, हे खरं आहे. बोनससंदर्भात तशी कर्मचाऱ्यांना फारशी अपेक्षा नसली तरी थोडीशी मात्र असतेच. अशाचप्रकारे कंपनीने एका खास पार्टीत आपल्या कर्मचाऱ्यांना आमंत्रित केले. यावेळी प्रत्येक कर्मचाऱ्याला एक पाकिट देण्यात आलं, नेहमीप्रमाणे यात कूपन वगैरे असतील असाच विचार प्रत्येक कर्मचाऱ्याने केला. मात्र पाकिट उघडल्यावर त्यात चक्क ख्रिसमसनिमित्त तुम्हाला कंपनीकडून ५० हजार डॉलर्सचा बोनस मिळत आहे असे लिहिले होते.

कंपनीने दिलेल्या या सरप्राईज गिफ्टबाबत सर्वच कर्मचारी खूप आनंदी होते. त्यांना या सर्व गोष्टी खऱ्या वाटत नव्हत्या. अनेक कंपन्या डिसेंबर महिन्यात काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. तसेच नवीन वर्ष आणि ख्रिसमस यानिमित्त कंपन्या बोनसदेखील जाहीर करतात. या बातमीनंतर मात्र अमेरिकेतील या कंपनी मालकाचे विशेष कौतुक होत आहे. अमेरिकेतील मेरीलॅंड शहरातील सेंट जॉर्न प्रॉपर्टीज ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रातील नावाजलेली कंपनी आहे. यावर्षी कंपनी मालकांनी दिलेले टार्गेट यशस्वीरित्या पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांना हा भरघोस बोनस दिल्याचे सांगितले आहे.

या कंपनीने आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ३५ लाखांचा बोनस दिला आहे. कंपनीने दिलेल्या एका पार्टीत कर्मचाऱ्यांना एक लिफाफा देण्यात आला. तो उघडल्यावर सर्व कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक महिला कर्मचाऱ्यांना तर अश्रू अनावर झाले. अमेरिकेतील आठ राज्यांमध्ये ही कंपनी काम करते. कंपनीतील कोणता कर्मचारी किती वर्षांपासून काम करतो याप्रमाणे हा बोनस देण्यात आला आहे. नुकताच कंपनीमध्ये आलेल्या कर्मचाऱ्याला १०० डॉलर म्हणजे सात हजार इतका बोनस दिला आहे. तर जास्तीत जास्त वर्षे काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला २ लाख ७० हजार डॉलर म्हणजेच १ कोटी ९० लाख इतका भरघोस बोनस देण्यात आला आहे.

बोनस म्हणून देण्यात आलेल्या या रकमेचा एकूण आकडा १७ कोटी एवढा आहे. कंपनीच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी खास करण्याचा विचार होता. म्हणूनच असा अवाढव्य बोनस आम्ही कर्मचाऱ्यांना दिल्याचे कंपनीचे अध्यक्ष लॉरेन्स मॅकरॅझ यांनी सांगितले. तसेच कंपनीने दिलेले हे गिफ्ट आम्हाला आयुष्यभर लक्षात राहिल असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. तेव्हा यंदाचे नवीन वर्ष आणि ख्रिसमस हे कर्मचारी दणक्यात साजरे करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...