दारूच्या नशेत झिंगलेल्या पोलिसाला धू-धू धुतले, वर्दी फाडली Watch Video

व्हायरल झालं जी
Updated Aug 09, 2018 | 17:12 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

उत्तर प्रदेश पोलिसांना शरमने मान खाली घालायला लावणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. बुलंदशहर येथे कथितपणे नशेच्या अमंलाखाली असलेल्या एका पोलिसाने आपल्या कारने दोन मोटारसायकलींना धडक दिली. यात तीन जण जखमी झाले. 

police beaten by public
दारूच्या नशेतील पोलिसाला नागरिकांनी दिला चोप   |  फोटो सौजन्य: ANI

मेरठ :  बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद भागात एका पोलिसाला मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सांगण्यात येत आहे की पोलीस दारूच्या नशेत झिंगला होता. त्यामुळे चालवत असलेल्या कारचे नियंत्रण सुटले आणि त्याने दोन मोटार सायकलीला टक्कर मारली यातील एकाची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर असलेल्या काही जणांनी दारूच्या नशेत असलेल्या पोलिसाला धू धू धुतले आणि त्याची वर्दी फाडली. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार ही घटना बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद भागातील चोला रोडची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सोमवारी कॉस्टेबल मनोज कुमार बुलंदशहरमध्ये कावड यात्रेच्या ड्युटीवर होता. 

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता. यावेळी त्याने दोघा मोटारसायकलला टक्कर मारली. या घटनेत तीन जण जखमी झाले. एकाची स्थिती गंभीर आहे. मोटार सायकलीला धडक दिल्यानंतर त्याची कार एका झाडाला जाऊन धडकली. 

या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी कॉन्स्टेबलचा बेल्ट काढून बेदम मारहाण केली. तसेच त्याची वर्दी फाडली. मनोज या पोलिसाला नंतर स्थानिक पोलिसांच्या हवाले करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दारूच्या नशेत झिंगलेल्या पोलिसाला धू-धू धुतले, वर्दी फाडली Watch Video Description: उत्तर प्रदेश पोलिसांना शरमने मान खाली घालायला लावणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. बुलंदशहर येथे कथितपणे नशेच्या अमंलाखाली असलेल्या एका पोलिसाने आपल्या कारने दोन मोटारसायकलींना धडक दिली. यात तीन जण जखमी झाले. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola