VIDEO: ट्रक पुलाच्या मध्यभागी आला आणि पूल कोसळला, भारत-चीन सीमेजवळील घटना

Bridge collapses in Uttarakhand: उत्तराखंडमधील मुनस्यारी-मिलाम रस्त्यावरील पूल कोसळल्यामुळे जवळजवळ डझनभर गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पूल कोसळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये सध्या व्हायरल होत आहे.

Bridge collapses
पूल कोसळला  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • उत्तराखंडमध्ये चीन-भारत सीमेला लागून असलेल्या भागातील पूल कोसळला
  • ट्रक मध्यभागी येताच पूल कोसळला, व्हिडिओ व्हायरल
  • पूल कोसळल्याने डझनभर गावाचा संपर्क तुटला

मुनस्यारी (उत्तराखंड): उत्तराखंडमधील भारत आणि चीनच्या सीमेजवळील मुनस्यारी-मिलाम रोडवरील पूल आज अचानक कोसळला. (Bridge collapses near indo-china border) ज्याचा व्हिडिओही आता व्हायरल होत आहे. अवजड वाहन घेऊन जाणारा हा ट्रक या पुलावरुन दुसऱ्या बाजूला जात असताना ही दुर्घटना घडली. जेव्हा ट्रक पुलाच्या मध्यभागी आला तेव्हा भार सहन झाल्याने हा पूल कोसळला. या घटनेत ट्रकमधील दोन लोक गंभीर जखमी झाले असून त्यात चालकाचा समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

व्हिडिओ व्हायरल (Video Viral)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की, पुलाच्या कडेला एक ट्रक उभा आहे, ज्यात एक अवजड पोकलेन मशीन भरलेले आहे. हाच पोकलेन घेऊन ट्रक दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करीत होता. पण जेव्हा ट्रक पुलाच्या मधोमध पोहोचला तेव्हा पूल एका झटक्यात कोसळला. यावेळी ट्रक देखील पुलासह नदीत कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

(पूल कोसळतानची दृश्य कॅमेऱ्यात कैद)

उत्तराखंडमध्ये घडली घटना

ही घटना पिथौरागड जिल्ह्यातील मुनस्यारीची आहे. जिथे मिलाम रोडवर हा पूल आहे. रस्ता बांधकामासाठी एका ट्रकवरुन पोकलेन मशीन घेऊन जात असताना हा अपघात घडला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच तेथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी ट्रक चालक व पोकलेन ऑपरेटरला बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसा, दोन्ही जखमींची प्रकृती ठीक असल्याचं समजतं आहे.

पूल कोसळल्याने वाहतुकीची मोठी समस्या

वास्तविक हा पूल अनेक गावांना जोडणारा असल्यामुळे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पण आता हा पूल तुटल्यामुळे डझनभर गावांचा मुनस्यारीशी संपर्क तुटला आहे. ज्यामुळे येथील गावकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर उभारुन वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी