उत्तराखंड: पूल कोसळला, वाहने नदीत वाहून गेली

उत्तराखंडमधील डेहराडून आणि ऋषिकेश दरम्यान रानीपोखरी पूल कोसळला. पुलावरील अनेक वाहने नदीत पडून वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Uttarakhand Rani Pokhri Bridge collapse on Dehradun Rishikesh Highway, couple of vehicles washed away
उत्तराखंड: पूल कोसळला, वाहने नदीत वाहून गेली 

थोडं पण कामाचं

  • उत्तराखंड: पूल कोसळला, वाहने नदीत वाहून गेली
  • घटनेचा व्हिडीओ व्हायरल
  • आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये - पोलीस

डेहराडून: सलग दोन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये अतीवृष्टी सुरू आहे. राज्यातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सततच्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जमीन खचणे, दरड कोसळणे अशा दुर्घटना सुरू आहेत. या अशा वातावरणातच उत्तराखंडमधील डेहराडून आणि ऋषिकेश दरम्यान रानीपोखरी पूल कोसळला. पुलावरील अनेक वाहने नदीत पडून वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. Uttarakhand Rani Pokhri Bridge collapse on Dehradun Rishikesh Highway, couple of vehicles washed away

पोलिसांनी रानीपोखरी पुलाच्या दुर्घटनेचा एक व्हिडीओ ट्वीट करुन नागरिकांना या रस्त्याचा वापर करणे टाळा; असे आवाहन केले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. याआधी मालदेवता-सहस्त्रधारा लिंक मार्ग नदीत वाहून गेला. परिसरातील घरांमध्ये पाणी, गाळ आणि रस्त्याचे अवशेष गेले. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडून सुरक्षित जागेवर स्थलांतर करावे लागले. 

उत्तराखंडमध्ये ठिकठिकाणी मदतकार्य सुरू आहे. आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन उत्तराखंड सरकारने केले आहे. राज्याच्या सखल भागांतील तसेच नदीकिनाऱ्यांजवळ राहणाऱ्या शेकडो नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. 

हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला होता यामुळे उत्तराखंड सरकारने आधीपासूनच खबरदारीचे उपाय सुरू केले होते. पण अतीवृष्टीच्या तडाख्याने उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी