[VIDEO] कारने ८ जणांना उडवले, भयानक अपघात सीसीटीव्हीत कैद 

 उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक भीषण अपघात झाला. यात एका कारने रस्त्यावरील आठ जणांना उडवले. हा अपघात गोरखपूरच्या मोहाद्दीपूर बाजार येथे घडला. 

gorkhpur car accident
गोरखपूरमध्ये भरधाव कारने ८ जणांना चिरडले  |  फोटो सौजन्य: Times Now

गोरखपूर :  भरधाव वेगाने येणाऱ्या कारने आठ पादचाऱ्यांना धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार गोरखपूरमध्ये घडला. यात सर्वच्या सर्व आठ पादचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील मोहाद्दीपूर बाजार या गजबजलेल्या ठिकाणी हा अपघात घडला. हा भीषण अपघात जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या कारच्या चालकाला अटक करण्यात आले आहे. तसेच त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा तो मद्याच्या अमलाखाली नव्हता हे दिसून आले आहे. अपघाताचे कारण प्रथम दर्शनी असे दिसते की, चालकाने ब्रेक ऐवजी एक्सलेटरवर जोराने पाय ठेवला. त्यामुळे गाडीवरील त्याचा ताबा सुटला आणि त्याने पादचाऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. 

व्हिडिओमध्ये आपल्याला एक भरधाव वेगाने येणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन बाईकला धडकली तसेच बाईकच्या आसपास असलेल्या दोघांना तिघांनाही या कारने धडक दिली. धडक इतकी जोरात होतील की बाईक चालक आणि पादचारी हवेत फेकले गेले. यात एक महिला थोडक्यात बचावली असल्याचेही व्हिडिओत पाहयला मिळत आहे. 

दरम्यान ज्या दोन बाईकला धडक दिली त्यावर तीन तीन प्रवासी प्रवास करत होत. यातील पहिल्या बाईकवरील दोन जण जखमी झाले तर दुसऱ्या बाईकवरील तिघेही जखमी झाले आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कार चालक आणि त्यातील प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी