[VIDEO] बापाची चिमुरड्याला दारू पिण्याची बळजबरी, पत्नीच्या घरून चोरून आणले मुलाला

आपल्या लहान मुलाला दारू पिण्याची बळजबरी करणाऱ्या एका माथेफिरू बापाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या या चिमुरड्याला बापाच्या तावडीतून सोडवण्यात यश आले असून बाप घटनेनंतर फरार आहे. 

video man forces infant son to drink alcohol after stealing him from wife s house crime news in marathi
[VIDEO] बापाची चिमुरड्याला दारू पिण्याची बळजबरी, पत्नीच्या घरून चोरून आणले मुलाला  |  फोटो सौजन्य: फेसबुक

थोडं पण कामाचं

  • कुमरेश याने आपल्या पत्नीच्या माहेरून मुलाची चोरी केली होती, पतीला सोडून पत्नी आपल्या आईच्या घरी राहत आहे. 
  • आपल्या पत्नीचा बदला घेण्यासाठी, तान्हुल्याला बळजबरीने पाजली दारू 
  • चिंताग्रस्त आईने महिला आणि बाल हेल्पलाइनला संपर्क साधून केली मुलाची सुटका 

बंगळुरू :  अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठी अनेक कठोर कायदे केले असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून चिमुरड्यांना या गुन्ह्यांना तोंड द्यावे लागत आहे.  असा काहीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एका निर्लज्ज बापाने आपल्या अल्पवयीन मुलाला बळजबरीने दारू पाजत आहे. या बापाने नाव कुमारेश आहे. 

या व्हिडिओमध्ये कुमारेश आपल्या लहान मुलासोबत जमीनीवर बसलेला दिसत आहे. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. या वेळी अल्पवयीन मुलगा दारू असलेल्या एका डिस्पोजेबल ग्लास हातात पकडलेला दिसत आहे.  मुलगा ग्लासातील पेयाचा वास घेतो आणि एक घोट पितो, त्याला दारूची कडवट चव लागते. त्यानंतर कुमारेश त्याला समोर असलेल्या एक प्लेटमध्ये ठेवलेला पदार्थ खायला देतो. 

त्यानंतर मुलगा तो ग्लास वडिलांकडे देतो, पण कुमारेश त्याला सांगतो एका झटक्यात ते संपव. या व्हिडिओत दिसते आहे की, निर्लज्ज बाप आपल्या मुलाला ग्लासातील दारू संपविण्यासाठी बळजबरी करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर अनेकांनी कुमारेशविरोधात कमेंट दिल्या आहेत. त्याच्या या कृत्याची निंदा केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कुमारेश यांच्या पत्नीने त्याला सोडले आहे. ती आपल्या आईच्या घरी राहत आहे. तिने आपल्यासोबत आपल्या मुलाला नेले आहे. 

कुमारेशला याचा राग आला आणि त्याने आपल्या पत्नीच्या माहेरून मुलाला चोरले. त्यानंतर पत्नीचा बदला घेण्यासाठी त्याने आपल्या मुलाला दारू पाजली आणि त्याचा व्हिडिओ काढला. 

ही बातमी कुमारेशच्या बायकोपर्यंत पोहचली तेव्हा तीने महिला आणि बाल हेल्पलाइनशी संपर्क साधला. त्यानंतर मुलाला वाचविण्यात यश आले. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांच्या भीतीने कुमारेशने पलायन केले असून तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...