Video: 'या' राज्यात मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सोशल डिस्टेंसिंगचा उडाला फज्जा, चक्क बारबालांचा डान्स

Social Distancing violated in Nalanda district: कोरोना महामारीबाबत बिहार प्रशासन किती गंभीर आहे,हे एका व्हिडिओ वरून दिसून पडतंय.मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जिल्ह्यात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडाल्याचं दिसलं

Dance video
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सोशल डिस्टेंसिंगचा उडाला फज्जा 

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जिल्ह्यात उडाला सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा
  • सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर चक्क बारबालांचा डान्स
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टीका

पाटना: बिहारमध्ये कोविड-१९(Covid-19) चं संक्रमण झपाट्यानं पसरत आहे आणि संक्रमण रोखण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचं सरकार कडक पावलं उचलत असल्याचा त्यांनी दावा केलाय. मात्र लॉकडाऊन (Lockdown) आणि सोशल डिस्टेंसिंगच्या (Social Distancing) बाबतीत प्रशासन किती गंभीर आहे, याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओवरूनच कळून येतंय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गृह जिल्ह्यात म्हणजेच नालंदामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर आयोजित कार्यक्रमात बारबालांचा डान्स ठेवला गेल्याचं प्रकरण समोर आलंय. या कार्यक्रमात सोशल डिस्टेंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. लोकं स्टेजवर हत्यारं हातात घेऊन नाचतांना व्हिडिओमध्ये )Video) दिसत आहेत.

‘सांस्कृतिक कार्यक्रमात’ झालं नियमांचं उल्लंघन

या कार्यक्रमात अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. इथं मास्क न घालता लोकं उपस्थित दिसले. इथं कोरोना संक्रमण पसरण्याचं संकट कुणालाच वाटलं नाही. डान्स कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर राष्ट्रीय जनता दलानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. राजद पक्षाचे नेते शक्ती यादव यांनी स्थानिक पोलीसांवर आणि कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांमध्ये राज्यात कोरोनानं झपाट्यानं आपले पाय पसारले आहेत. पटनासह राज्यातील अनेक ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये कोविड-१९ सोबत लढण्यासाठी पूर्णपणे तयारी केली नसल्याचं दिसून येतंय.

राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झाली २७ हजारांच्यावर

बिहारमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत बैठक केली. आपल्या एका ट्वीटमध्ये पांडे यांनी सांगितलं, ‘मुख्य सचिवालयाच्या ऑडिटोरियममध्ये केंद्रीय आरोग्यमंत्रीच्या टीम सोबत बैठक झाली.’ केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी म्हटलं होतं की, कोरोना व्हायरसपासून लढण्यात बिहार सरकारला मदत पोहोचविण्यासाठी एक केंद्रीय टीम तैनात केली गेली आहे. राज्यामध्ये कोविड-१९ मुळे संक्रमित रुग्णांची संख्या २७,४५५ झाली आहे. राज्यात या महामारीमुळे आतापर्यंत १८७ लोकांचा बिहारमध्ये मृत्यू झालेला आहे. तर आतापर्यंत राज्यात १९,८७६ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी