VIDEO: सियाचिनमध्ये सैनिक हातोडीनं तोडतायत अंडी, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल सलाम

व्हायरल झालं जी
Updated Jun 09, 2019 | 17:27 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Indian Army: जगातील सर्वात उंच रणांगण असलेल्या सियाचिनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक भारतीय सैन्यातील जवानांसमोर नतमस्तक होईल. पाहा हा व्हिडिओ...

siachen soldiers video
सियाचिनमधील भारतीय जवानांचा व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली: भारतीय सैन्याबद्दल तसा प्रत्येक नागरिकाच्या मनात हा अभिमान आहेच. मात्र आपला अभिमान अधिक द्विगुणित करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जगातील सर्वात उंच असलेल्या रणांगणावर सैनिक बर्फाच्छदित प्रदेशात कसे राहतात, दररोज कोणत्या संकटांचा सामना करतात, हे या व्हिडिओमधून आपण पाहू शकतो. सियाचिनमधील भारतीय सैनिकांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तीन जवान फ्रूट ज्यूसचा टेट्रा पॅक तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो तोडल्यानंतर आपण पाहू शकतो की, त्यातून ज्यूस नाही तर बर्फ झालेला दिसतोय. त्यानंतर ज्यूस पिण्यासाठी त्यांना तो बर्फ उकळावा लागला. भारतीय जवान या व्हिडिओमध्ये सांगतांना दिसतायेत की, अंडी तोडण्यासाठी त्यांना हातोडीचा वापर करावा लागतो. 

या व्हिडिओमध्ये एक जवान सांगतोय, ‘फ्रूट ज्यूस त्यांना गरम करून प्यावा लागतो. हातोडी मारूनही तो तुटत नाही. ज्यूसच्या पॅकचं कव्हर काढून त्यांना तो बर्फ पातेल्यात गरम करावा लागतो, मग ज्यूस पिता येतो. तर ग्लेशिअरमध्ये अंड खाण्यासाठी त्यांना ते हातोडीनं तोडावं लागतं. पण तरीही ते तुटत नाही. तसंच बटाटा, टमाटर या भाज्या सुद्धा हातोडीच्या मदतीनं तोडता येतात’. त्यामुळे इथं बर्फात काम करणं खूप कठीण असतं. कारण इथलं तापमान उणे ४० ते ७० अंशांपर्यंत खाली जातं. तेव्हा जगणं खूप कठीण होऊन बसतं. व्हिडिओमध्ये एक जवान हातोडीनं अंड तोडतांना दिसतोय.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यावर एका यूजरनं ट्विटरवर लिहिलंय, ‘आमचे जवान सियाचिनमध्ये खूप कठीण वातावरणाचा सामना करतात. हा व्हिडिओ तथाकथित सेक्युलरवाद्यांना पाठवा, जे भारतीय सैन्याचं नैतिक खच्चीकरण करतात. सैन्याबद्दल बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत.’ तर दुसरा एक यूजर म्हणतोय, ‘हे देवा, हे खूपच वेदनादायक आहे. आमचे शूर सैनिक सियाचिनमध्ये पराक्रम करतायेत. त्यांचं जीवन खूप कठीण आहे.’

आणखीही काही यूजर्सनी ट्विटरवरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलंय,’आपला त्याग आणि साहसाचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दही नाहीयेत. आपल्यामुळेच आम्ही नागरीक सुरक्षित आहोत. देवा त्यांना शक्ती दे.’ तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, ‘हे तर काहीच नाही, आपण कल्पना पण नाही करू शकत, अशा परिस्थितीत हे लोक महिनोंमहिने तिथं कसे राहतात. भारतीय जवानांना त्यांच्या ट्रेनिंग दरम्यान अशा परिस्थितीत राहण्याचं शिक्षण दिलं जातं. मात्र हे खूप कठीण आहे. आम्हाला आपल्या सैन्याचा खूप अभिमान आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी