[VIDEO] रॉकेटच्या स्पीडने उडून ६००० फुटांवर पोहचला जेटमॅन, पाहून आश्चर्याचा धक्का बसेल 

व्हायरल झालं जी
Updated Feb 20, 2020 | 17:20 IST

विंस रेफेट याने जेटमॅनचा स्टंट करत रॉकेटच्या वेगाने उडून दुबईच्या आकाशात बुर्ज खलीफापेक्षा उंच पोहचला. 

दुबई :  विंस रेफेट याने दुबईच्या अवकाशात नुकताच जेटमॅनचा स्टंट करून रॉकेटच्या स्पीडने उडण्याचा एक चित्तथरारक स्टंट केला आहे. आकाशात तो एका पक्ष्याप्रमाणे दिसत होता. मार्वेलमध्ये आर्यन मॅनची आठवण होईल असा १८०० मीटर मुहणजे सुमारे ६००० फूटांच्या उंचीवर पोहचला होता. रेफेट आणि त्याचे सहकारी 'जेटमॅन' म्हणून ओळखले जातात. रेफेट जेटपॅक आणि कार्बन फायबर विंगच्या मदतीने नव्या उंचीवर पोहचला आहे. त्याने अनेक हवाई कलाबाजी केली. रॉकेटच्या वेगाने हवेला चिरून आकाशात तो पोहचला. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

फ्रान्सचा राहणाऱ्या या व्यक्तीने दुबईच्या समुद्र किनारी क्रिस्टल वॉटरपासून पाच मीटर वर हवेत शुटींग संपविण्यापूर्वी आकाशात शहराच्या वर उडत होता. दुबई एक्स्पोने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले की @jetmandubai सोबत १०० टक्के स्वायत्त मानव उड्डाण पूर्ण केले आहे. त्याने १८०० मीटरपर्यंत उंची गाठली होती. त्याने जामीनवरून उड्डाण घेतले आहे. 

पुढील ध्येय पॅराशूट न उघडता खाली उतरणे

जेटमॅनने यापूर्वी उंच प्लॅटफॉर्मवरून खाली उडी मारून हवेत लॉन्च केले आहेत. रेफेटने एक वक्तव्यात म्हटले की हे यश पूर्णपणे टीम वर्कमुळे शक्य झाले आहे. यात छोट्या पावलामुळे मोठा परिणाम होतो. सर्व काही योजनेनुसार झाले आणि आम्ही जे मिळवले त्यामुळे आम्ही खुश आहोत. आता पुढील लक्ष हे असणार आहे की एका उंचीवर पोहचल्यावर जमीनीवर विना पॅराशूटने खाली उतरवणे. यावर आता काम सुरू आहे. 

४०० किलोमीटर प्रति ताशी गतीने उडण्याची क्षमता

रेफेटने कार्बन फायबर विंग चार मिनी जेट इंजिनद्वारे संचलित आहे. नियंत्रित होणाऱ्या उपकरणाने पायलटची मुव्हमेट ताशी ४०० किलोमीटरच्या वेगापर्यंत पोहचता येते. शुक्रवारी रेफेट यांनी दुबईच्या समुद्र किनाऱ्यावरून क्रिस्ट वॉटरवरून पाच मीटर हवेतून सुरूवात केली आणि शहराच्या क्षितीजावर पोहचला. 

बुर्ज खलिफावर पोहचला जेटमॅन 

जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाच्या वर आणि जगातील सर्वात मोठ्या वाणिज्य विमान एमिरेट्स एअरबस ए ३८० सोबत जेटमॅनने दुबईत चित्तथरारक उड्डाण केले. गेल्या वर्षी रेफेट आणि त्याचा साथीदारांनी फ्रेंचमन फ्रेड फुगेनने चीनच्या हुनान प्रांताच्या डोंगरातील प्रसिद्ध हेवन गेट्सवरून उड्डाण केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...