नागपूरमध्ये तालिबानी! नागपूरमध्ये १० वर्षांपासून होता एक तालिबानी, एलएमजीसोबत फोटो झाला व्हायरल...

तालिबान फौजेमधील तरुणांपैकी एकाचे नागपूरशी (Talibani in Nagpur) कनेक्शनदेखील समोर आले होते. हा तालिबानी नागपूरमध्ये मागील १० वर्षांपासून राहत होता आणि त्याला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटकदेखील केली होती.

Talibani in Nagpur
नागपूरमध्ये राहत होता तालिबानी 
थोडं पण कामाचं
  • नागपूरमध्ये मागील १० वर्षांपासून राहत होता तालिबानी
  • २३ जून २०२१ला अफगाणिस्तानला केली होती रवानगी
  • आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर फोटो होतो आहे व्हायरल

नवी दिल्ली: सध्या सर्व जगाचे लक्ष एकाच ठिकाणी केंद्रीत झाले आहे ते म्हणजे अफगाणिस्तान (Afghanistan). तालिबानने (Taliban) पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर सर्व जगच तेथील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानात पुन्हा एकदा नंगानाच सुरू केल्यानंतर, त्याचे फोटो (Viral Photo) आणि व्हिडिओ (Viral Video) जगभर व्हायरल होत आहेत. तालिबान्यांच्या अत्याचाराच्या कहाण्या पुन्हा एकदा चर्चिल्या जात आहेत. तालिबान फौजेमधील तरुणांपैकी एकाचे नागपूरशी (Talibani in Nagpur) कनेक्शनदेखील समोर आले होते. हा तालिबानी नागपूरमध्ये मागील १० वर्षांपासून राहत होता आणि त्याला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटकदेखील केली होती. मात्र त्यानंतर २३ जून २०२१ ला त्याला परत अफगाणिस्तानला पाठवण्यात आले होते. (Viral News: Taliban terrorist was in Nagpur for 10 years, photos gone viral)

सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो (Photos viral on Social Media)

सोशल मीडियावर सध्या एका तालिबान्याचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. हा फोटो आहे नूर मोहम्मद उर्फ अब्दुल हक याचा. हा तालिबानी संघटनेशी जोडलेला होता. त्यावेळचा त्याचा फोटोदेखील समोर आला आहे. नागपूरमधील अनेक नागरिकांनी आणि संघटनांनी तक्रार केल्यानंतर नूर मोहम्मदला नागपूर पोलिसांनी १६ जून २०२१ला अटक केली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. तपासात असे आढळून आले होते की नूर मोहम्मदच्या शरीरावर गोळ्यांचे अनेक व्रण किंवा जखमांच्या अनेक खुणा आहेत. त्याच्याकडून तालिबान संघटनेचे अनेक व्हिडिओदेखील पोलिसांना मिळाले. दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचीही माहिती पोलिसांसमोर आली होती.

नूर मोहम्मदची अफगाणिस्तानात रवानगी (Noor Mohammad)

नूर मोहम्मदच्या तपासानंतर नागपूर पोलिसांनी २३ जून २०२१ला नूर मोहम्मद उर्फ अब्दुल हक (Noor Mohammad)याला अफगाणिस्तानच्या दूतावासाशी संपर्क करत परत अफगाणिस्तानात पाठवले होते. जवळपास दोन महिन्यांनी जे फोटो समोर आले आहेत त्यात नूर मोहम्मद उर्फ अब्दुल हक याचा तालिबानशी असलेला संबंध समोर आला आहे. या फोटोमध्ये नूर मोहम्मदच्या हातात एलएमजी मशीन गन आहे. त्याचबरोबर मशीन गनच्या अनेक बुलेट्स देखील आहेत. या फोटोत तो एक तालिबानीच दिसतो आहे. शिवाय नूर मोहम्मदचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे त्यात तो एका हातात खंजीर घेऊन अफगाणी भाषेत धमकावतो आहे.

गुप्तचर यंत्रणांना देण्यात आली माहिती

नूर मोहम्मदचा फोटो व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी नागपूर पोलिस आणि त्याच्या गुप्त विभागाला माहिती दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी यासंदर्भात नागपूर पोलिसांकडे स्पष्टीकरण मागवले आहे. अर्थात पोलिसांनी यासंदर्भात माहिती नसल्याचे म्हटले आहे. मात्र नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे की ही बाब खरी आहे की आम्ही नूर मोहम्मद नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. तो मागील १० वर्षांपासून नागपूरमध्ये कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहत होता. आम्ही त्यासंदर्भात तपास केला आणि त्यानंतर नियमानुसार त्याला अफगाणिस्तानच्या दूतावासाच्या मदतीने परत अफगाणिस्तानात पाठवले होते. त्यानंतर तिथे जाऊन तो काय करतो आहे याची आम्हाला कल्पना नाही. आमच्याकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. फोटोतील व्यक्तीच तोच माणूस आहे का हेदेखील निश्चित सांगणे अवघड आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी