VIRAL VIDEO: माकडाला लागली शाळेची ओढ; दररोज वर्गात असतो उपस्थित, पाहा व्हिडिओ

व्हायरल झालं जी
Updated Sep 15, 2022 | 23:48 IST

Monkey attends school video goes viral: सोशल मीडियात एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माकड चक्क शाळेत दररोज हजेरी लावताना दिसून येत आहे. 

Monkey in school: सोशल मीडियात दररोज विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारे एका माकडाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा माकड दररोज शाळेत हजेरी लावतो इतकेच नाही तर वर्गात विद्यार्थ्यांसोबत सुद्धा बसलेला दिसून येत आहे. हा व्हिडिओ झारखंडमधील असल्याचं बोललं जात आहे. (viral video monkey attends class in school daily watch it)

व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, माकड चक्क विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसलेला आहे. इतकेच नाही तर शाळेत प्रार्थनेच्या दरम्यानही हा माकड उपस्थित असतो. या माकडाला वर्गातून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला मात्र, तो वर्गातून बाहेर जायला तयारच नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी