Money shower in Temple: भारतातील या मंदिरात पडतो पैशांचा पाऊस, तुम्ही पाहिला का हा VIDEO

Viral Video of Money Shower: मंदिरात भाविक नेहमीच देणगी देत असतात पण आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात भाविकांकडून मंदिरात पैशांचा वर्षाव केला जात आहे.

viral video of dwarkadhish temple which shows devotees offer money infront of lord watch it
Money shower in Temple: भारतातील या मंदिरात पडतो पैशांचा पाऊस, तुम्ही पाहिला का हा VIDEO 

Video of money shower in temple: संपूर्ण भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या देव-देवतांची मंदिरे पहायला मिळतात. या मंदिरात भाविक आपली मनोभावे पूजा करत असतात. त्याचवेळी भाविकांकडून नारळ, तेल, दूध अर्पण करण्याचीही परंपरा आहे. काही भाविक देणगी देतात तर काही भाविक आपलं नाव गुप्त ठेवत महागडी आभूषणं अर्पण सुद्धा करत असतात. पण आता मंदिरात पैशांचा वर्षाव होण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (viral video of dwarkadhish temple which shows devotees offer money in front of lord watch it)

काही मंदिरे अशी आहेत ज्या ठिकाणी देश-विदेशातील भाविक येत असतात. काही मंदिरात भाविक विविध प्रकारे नैवेद्य देतात तर काही ठिकाणी महागड्या वस्तू अर्पण केल्या जातात. आता द्वारकाधीश मंदिरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून क्षणभर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. कारण, या मंदिरात भाविकांकडून ज्या पद्धतीने पैसे अर्पण केले जात आहेत ते पाहून कुणीही थक्क होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी