झारखंड : बारा वर्षांच्या सरफराजने सांगितली शाळेची धक्कादायक सत्यकथा

Jharkhand Student Reporter: झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात राहणाऱ्या बारा वर्षांच्या सरफराजने कॅमेऱ्याला सामोरे जाऊन बेधडकपणे स्वतःच्या शाळेची धक्कादायक सत्यकथा जगजाहीर केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Jharkhand Student Reporter
झारखंड : बारा वर्षांच्या सरफराजने सांगितली शाळेची धक्कादायक सत्यकथा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • झारखंड : बारा वर्षांच्या सरफराजने सांगितली शाळेची धक्कादायक सत्यकथा
  • व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल
  • शाळेत पाण्याची आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही

Jharkhand Student Reporter: झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात राहणाऱ्या बारा वर्षांच्या सरफराजने कॅमेऱ्याला सामोरे जाऊन बेधडकपणे स्वतःच्या शाळेची धक्कादायक सत्यकथा जगजाहीर केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Infant buried : जमिनीतून अचानक बाहेर आला एक हात, आतमध्ये होतं जिवंत नवजात बाळ

उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी मतदान

Viral Video : छतावरून कोसळला तरुण, भावाने ‘कॅच’ करत वाचवला जीव

व्हिडीओत सरफराज गोड्डा जिल्ह्यातील एका शाळेची माहिती देताना दिसतो. ही एक सरकारी शाळा आहे. पण शाळेत शिकणे-शिकविणे बंद आहे. अनेक दिवसांपासून शाळेची इमारत अस्तित्वात आहे पण शाळेत होतात ती इतर कामं त्या ठिकाणी होताना दिसत नाहीत. 

Viral Video, मरता मरता वाचले दोघे

शाळेच्या इमारतीत तसेच इमारतीच्या आवारात जिथे जिथे कॅमेरा जातो ती जागा बघून संबंधित सरकारी शाळा शालेय कामकाजासाठी वापरली जात नसल्याचे लक्षात येते. शाळेत पाण्याची आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. वापरात नसल्यामुळे शाळेच्या इमारतीची दूरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी धूळ आणि पालापाचोळा आहे. शाळेत काही ठिकाणी मोकळ्या जागेवर उगवते तसे गवत उगवले आहे.

शाळा वापरात नसल्यामुळे परिसरातील मुलांचे हाल होत आहेत. त्यांना शिक्षण घ्यायला जवळच्या भागात सोय उपलब्ध नाही. यामुळे इच्छा असूनही अनेक मुलांना शाळेत जाऊन शिक्षण घेणे कठीण झाले आहे. या अशा अनेक बाबी सरफराजने कॅमेऱ्यासमोर बेधडकपणे सांगितल्या आहेत. 

व्हिडीओ व्हायरल होण्यास सुरवात होताच काही जणांनी सरफराझला धमक्या देणारे फोन केले असल्याचे वृत्त आहे. पण सरफराझने झारखंडमधील ग्रामीण भागात सरकारी शिक्षण व्यवस्थेची वाईट अवस्था असल्याचे सत्य जगापुढे मांडले आहे.

सरफराझने धाडस करून एका शाळेची वाईट अवस्था जगापुढे आणली आहे. पण भारतात अशा आणखी किती शाळा वाईट स्थितीत आहेत हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी