भरधाव कारने धडक दिल्याने हवेत उडाला वृद्ध, कॅमेऱ्यात कैद झाले हे भीतीदायक दृश्य

व्हायरल झालं जी
Updated May 27, 2022 | 12:24 IST

Accident Viral Video: सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले. कारण, एका कारने वृद्धाला जोरदार धडक दिली, त्यामुळे धक्कादायकरित्या तो वृद्ध हवेत उडाला.

थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात.
  • काही व्हिडीओ असे आहेत की ते पाहिल्यानंतर लोकांना ते हादरवून टाकतात. 
  •  अशाच एका अपघाताचा असा व्हिडिओ समोर आला आहे

Accident Viral Video: सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ असे आहेत की ते पाहिल्यानंतर लोकांना ते हादरवून टाकतात.  (Watch video car hit 66 years old man read story in marathi )

 अशाच एका अपघाताचा असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील गीता कॉलनी येथील स्कूटर मार्केटमध्ये एका 66 वर्षीय व्यक्तीला एका वेगवान कारने धडक दिली. 
 
 टक्कर होताच वृद्ध हवेत उडाला. हे भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले, जे पाहून सगळेच हैराण झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी